नांदेड : लोकअदालतीत सव्वादोन हजार प्रकरणांचा निपटारा 

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 18 मार्च 2019

नांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधीकरणच्या वतीने रविवारी (ता. १७) आयोजीत केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दोन हजार २५८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यातून, जवळपास १५ कोटी ४८ लाख ३९ हजाराची तडजोड करण्यात आली. विशेष म्हणजे प्रमुख जिल्हा न्यायाधिश दीपक ढोलकिया, जिल्हा न्यायाधिश (पहिले) एस. एस. खरात आणि जिल्हा न्यायाधिश (सहावे) व्ही. के. मांडे यांनी अपघातप्रकरणी मयत प्राध्यापकाच्या कुटूंबाला एक कोटी रुपयाचा धनादेश विमा कंपनीकडून मिळवून दिला. मराठवाड्यात ही विक्रमी रक्कमेची तडजोड झाल्याचे न्यायाधिश डी. टी. वसावे यांनी सांगितले. 

प्रमुख जिल्हा न्यायाधिश ढोलकिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्वच न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. लोकन्यायालयात ठेवण्यात आलेल्या प्रकरणापैकी दोन हजार २५८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन. आय. ऍक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन व इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय यांच्या प्रकरणांचा व विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपुर्व प्रकरणांचा समावेश होता. नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड. मिलींद लाठकर, जिल्हा सरकारी वकिल ऍड. संजय लाठकर तसेच जिल्ह्यातील सर्व सन्माननिय विधिज्ञ आणि विविध विभागाचे अधिकारी तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. 

विशेष म्हणजे प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिपक ढोलकिया यांनी स्वतः पुढाकार घेऊन न्यायाधिश एस. एस. खरात,  न्यायाधिश व्ही. के. मांडे यांच्या न्यायालयातील प्रकरण क्र. १७७/ २०१८ कमलाबाई विठ्ठलराव रगडे व इतर विरुध्द युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या प्रलंबित प्रकरणामध्ये वादीतर्फे ऍड. आय. सी. जोंधळे आणि ऍड. रणजीतसिंह बैस यांच्या मध्यस्थीने एक कोटी तीन लाख २९ हजार ९४९ रुपयाची तडजोड करुन प्रकरण निकाली काढले व वादीला सदर रक्कमेचा धनादेश देण्यात आला. 

प्रमुख जिल्हा न्यायाधीश ढोलकिया यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधिश डी. टी. वसावे यांनी उपस्थित असलेल्या सर्व पक्षकार तसेच सर्व न्यायाधीश, विधिज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी वृंद व सदरील लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केली आहे.

Web Title: Settlement of thousands of cases in public court