औरंगाबाद : सातशे एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर   

प्रकाश बनकर 
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

700 एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर आहे. शहरात एटीएम फोडीच्या घटना घडल्यानंतरही बॅंकांनी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली नाही. 

औरंगाबाद : शहर व जिल्हा मिळून विविध बॅंकांचे एकूण एक हजार एटीएम आहेत. यातील केवळ तीनशे एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. उर्वरित 700 एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर आहे. शहरात एटीएम फोडीच्या घटना घडल्यानंतरही बॅंकांनी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली नाही. 

शहर आणि जिल्ह्यात 22 बॅंकांचे एटीएम आहेत. यातील केवळ 300 एटीएमवर सुरक्षा रक्षक आहेत. त्यातही त्यांनी बॅंकाची शाखा असलेल्या ठिकाणच्याच एटीएमवर सुरक्षा रक्षक नेमले आहेत. बॅंक आणि एटीएम अशा दुहेरी सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. नाही म्हणायला काही 
बॅंकांनी वर्दळीच्या ठिकाणासह अन्य ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले आहेत; मात्र संख्या नगण्य आहे. 700 एटीएम अजूनही सुरक्षा रक्षकाविनाच आहेत. अशाच एटीएमला चोरटे टार्गेट करीत आहेत. 

बॅंकांनंतर ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण सेवा देणारे हे एटीएम आहे. बॅंकांमध्ये ज्या प्रमाणे सुरक्षा ठेवली जाते त्याचप्रमाणे एटीएमची सुरक्षा मजबूत केली पाहिजे. अनेक एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर आहे. तेथे सुरक्षा रक्षक नेमावेत. 
- देविदास तुळजापूरकर, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन. 

 

जिल्ह्यातील एटीएमवर विभाग  एटीएम संख्या  सुरक्षा रक्षक असलेले एटीएम  वाऱ्यावर असलेले एटीएम 
औरंगाबाद शहर 500  200 300
औरंगाबाद जिल्हा (ग्रामीण) 500 100 400
एकूण 1000 300 700

 

Web Title: Seven hundred ATMs are unsafe in Aurangabad