सात लाखाची बॅग पळविणाऱ्यास पाठलाग करून पकडले; एक तास थरार

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 15 एप्रिल 2019

.... यावेळी परसावळे यांनी पाठलाग करीत समोर कर्तव्यावरील पोलिस मधुकर टोणगे आणि दत्तराम जाधव यांनी पाठलाग केला. तब्बल गल्लीबोळातून त्याचा पाठलाग करत अखेर प्रमोद मानेकर याला अटक केली. त्याच्याकडून सात लाखाची बॅग जप्त केली.

नांदेड : एकाला खंजरचा धाक दाखवून त्याच्याकडील सात लाखाची बॅग लंपास करणाऱ्या चोरट्यास वजिराबाद पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून सात लाखाची बॅग व एक खंजर जप्त केला. हा प्रकार जुना मोंढा भागात चाललेल्या एका तासाच्या थरारानंतर त्याला पाठलाग करून रविवारी (ता. १४) रात्री नऊच्या सुमारास अटक केली. 

शहराच्या जुना मोंढा भागात मल्लीकार्जून विजयकुमार महाजन यांचे दुकान आहे. त्यांच्याकडे मॅरीको आणि पॅराशूटखोबरेल तेलाचे डीस्ट्रीब्युटर्सची एजन्सी आहे. ते जिल्हा व बाहेर जिल्ह्यात आपल्या मालाची विक्री करतात. त्यांच्याकडे सतीश वैजनाथ परसावळे (वय ३२) हा मुनीम म्हणून काम करतो. तो रविवारी (ता. १४) जालना येथे वसुलीसाठी गेला होता. वसुलीचे सहा लाख ९५ हजार ७०० रुपये घेऊन तो नांदेडला परत आला. रात्री मुरमुरा गल्ली भागातून जवळच असलेल्या दुकान मालक महाजन यांच्या घरी जात होता. रात्री नऊच्या सुमारास तो तेथे पोहचला. यावेळी शितला माता मंदीर, जुना गंज परिसरात राहणारा प्रमोद रंगनाथ मानेकर (वय २३) याने सतीश परसावळे याला खंजरचा धाक दाखवून त्याच्याकडील सात हजाराची बॅग लंपास केली.

यावेळी परसावळे यांनी पाठलाग करीत समोर कर्तव्यावरील पोलिस मधुकर टोणगे आणि दत्तराम जाधव यांनी पाठलाग केला. तब्बल गल्लीबोळातून त्याचा पाठलाग करत अखेर प्रमोद मानेकर याला अटक केली. त्याच्याकडून सात लाखाची बॅग जप्त केली. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत पाठविले आहे. पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस उपाधिक्षक अभिजीत फस्के आणि पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी या कर्मचाऱ्यांचे कौतूक करून दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे.

Web Title: Seven lakh bag thieves caught in nanded

टॅग्स