लातूर जिल्ह्यातून सात हजार ९८६ विद्यार्थी देणार एमपीएससी परीक्षा

4MPSC_11
4MPSC_11
Updated on

लातूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० जिल्ह्यातील विविध १९ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात सात हजार ९८६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ती दोन सत्रांत होणार आहे. रविवारी (ता.११) सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी तीन ते पाच या वेळेत ही परीक्षा होत आहे. या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.


त्यानुसार राजर्षी शाहू वाणिज्य महाविद्यालय, श्री.देशीकेंद्र विद्यालय, यशवंत विद्यालय, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय (कॉकसीट) ब्लॉक अ (पहिला व दुसरा मजला), ब्लॉक ब (दुसरा व तिसरा मजला ), दयानंद वाणिज्य व बी.सी.ए. महाविद्यालय, परिमल विद्यालय, महात्मा बसवेश्वर विज्ञान महाविद्यालय, गोदावरी लाहोटी कन्या विद्यालय, सरस्वती विद्यालय, दयानंद कला महाविद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला, राजर्षि शाहू विज्ञान महाविद्यालय, श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय, ज्ञानेश्वर विद्यालय, श्री.मारवाडी राजस्थान विद्यालय, श्री. व्यंकटेश विद्यालय, दयानंद विधी महाविद्यालय व श्री.केशवराज विद्यालयात ही परीक्षा केंद्रे आहेत.

या केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी येणार आहेत. त्यामुळे परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन अपर जिल्हा दंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. परीक्षा केंद्राचे परिसरात प्रवेश करते वेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेशावर बंदी आहे.

कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राचे परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करता येणार नाही. शंभर मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनिक्षेपक आदी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्रांच्या परिसरात मोबाईल फोन, ई-मेल व इतर साहित्य घेऊन प्रवेश करण्यास मनाई असणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com