ध्रुवीय वाऱ्यामुळे थंडीचा तडाखा

औरंगाबाद ः गार वाऱ्यामुळे शॉल आणि कानटोपी घातलेला सायकलस्वार.
औरंगाबाद ः गार वाऱ्यामुळे शॉल आणि कानटोपी घातलेला सायकलस्वार.

औरंगाबाद - जमिनीपासून साधारण दोन किलोमीटर उंचीवरून वाहणाऱ्या ध्रुवीय वाऱ्याचे तापमान घटले. त्यामुळे किमान तापमान 13 अंश सेल्सिअस असूनही थंडीचा तडाखा बसत आहे. या वाहणाऱ्या वाऱ्यात वाफा असल्याने महाराष्ट्राच्या अनेक भागांतील वातावरण ढगाळ झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. 


तापमानात फारशी घसरण नसली तरी वाहणारे वारे गार असल्याने थंडीचा अनुभव येत आहे. ध्रुवीय वारे सध्या महाराष्ट्रावरून वाहत आहेत. जमिनीपासून 2 ते 2.3 किलोमीटर उंचीवरून वाहत असलेल्या या वाऱ्याचा वेग सध्या 120 ते 140 किलोमीटर प्रतितास असून, त्याचे तापमान नेहमीपेक्षा कमी आहे. एरव्ही, उणे 20 ते शून्य अंशांपर्यंत असलेले हे तापमान सध्या उणे 50 ते उणे 70 अंशांपर्यंत खाली गेल्याने हवेत गारवा असल्याची माहिती डॉ. एपीजे अब्दुल कलाम खगोल आणि अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी दिली. सध्या वाहत असलेल्या हवेत वाफेचे प्रमाण चांगले आहे. ही वाफ विरघळून न गेल्याने त्याचा परिणाम वातावरणातील ढगाळपणावर झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
फेब्रुवारीचा आरंभही गारव्यात 
सध्या असलेल्या वातावरणाचा परिणाम लगेच कमी न होता फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीसही कायम राहणार आहे. वाऱ्याचा वेग कमी झाला तरी थंडीचा तडाखा कायम राहणार आहे. त्यामुळे 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत थंडी कायम राहण्याची शक्‍यता आहे. तापमानावर याचा फारसा परिणाम होण्याची शक्‍यता नसली तरी, हुडहुडीही राहणार असल्याचे श्री. औंधकर म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com