‘शाहू’चे ६७ टक्के विद्यार्थी जेईई-अॅडव्हान्ससाठी पात्र

९९ पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण मिळवणारे १३ विद्यार्थी
shahu college
shahu college sakal

लातूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) प्रथमच चार सत्रांमध्ये जेईई मेन-२०२१ परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सर्वोत्तम असणाऱ्या एकूण पर्सेंटाईल गुणांवर विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक देण्यात आलेला आहे. या परीक्षेत राजर्षी शाहू महाविद्यालयातील ६७ टक्के विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. तेरा विद्यार्थ्यांना ९९ पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

यंदा एनटीएद्वारे घेण्यात आलेल्या जेईई- मेन्स परीक्षेमधून जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे कट ऑफ आणि कंसात महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांची संख्या पुढील प्रमाणे ः जनरल ग्रुप ८७.८९९२२४ (७२ विद्यार्थी) जनरल ईडब्ल्युएस ६६.२२१४८४५ (१६ विद्यार्थी), ओबीसी ६८.०२३४४४७ (४० विद्यार्थी), एस. सी. ४६.८८२५३३८ (१४ विद्यार्थी), एस. टी. ३४.६७२८९९९ (९ विद्यार्थी), पीडब्ल्यूडी -०.००९६३७५ (१ विद्यार्थी) असे एकूण १५३ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. जेईई-मेन परीक्षा दोन कारणांसाठी महत्त्वपूर्ण समजली जाते. ज्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टियूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधील प्रवेश व जेईई अॅडव्हान्स परीक्षा पात्रता फेरीचा समावेश होतो. शिव छत्रपती शिक्षण संस्थेअंतर्गत येणाऱ्या राजर्षी शाहू ज्युनिअर सायन्स कॉलेज व संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी यात यश मिळवले आहे.

shahu college
ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन; पाहा व्हिडिओ

संस्थेतील सुमारे २२७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १५३ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाण ६७ टक्के एवढे आहे. ज्यामध्ये ९९ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १३ आहे. ९५ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेणारे ४० विद्यार्थी, ९० पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेणारे ६५ विद्यार्थी, ८७ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेणारे ७२ विद्यार्थी आहे. संस्थेच्या तेजस पवन माकोडे या विद्यार्थ्याने ९९.९१०४९७४ पर्सेंटाईल गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला. सानिका ज्ञानेश्वर लांडगे हिने ९९.८२७८३०१ पर्सेंटाईल गुण संपादित करून मुलीत व इतर मागास संवर्गातूनप्रथम व महाविद्यालयातून सर्वद्वितीय आली. सृष्टी भगवान जुनघरे या विद्यार्थिनीने ९९.६८५६५२८ पर्सेंटाईल गुण मिळवूनतृतीय क्रमांक पटकावला. गजानन सुरेश सापसोड या विद्यार्थ्याने ९९.४४४९०८१ पर्सेंटाईल गुण मिळवून ईडब्ल्यूएस संवर्गातून प्रथम क्रमांक मिळवला.

shahu college
नगर-आष्टी मार्गावर भीषण अपघात, एक ठार अन् चार गंभीर जखमी

अनुसूचित जाती संवर्गातून देवश्री प्रकाश देऊळकर या विद्यार्थिनीने ९८.७७९२५३१ पर्सेंटाईल गुण मिळवले. अनुसूचित जमाती संवर्गातून साईनाथ साहेबराव रेनेवाड या विद्यार्थ्याने ९६.८२४५९५१ पर्सेंटाईल गुण मिळवले. यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्ये म्हणजे महाविद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थ्यांत दोन मुलींनी बाजी मारली. तर अनुसूचितसंवर्गातून प्रथम येण्याचा मान देखील मुलीनेच मिळविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com