World Wrestling Competition : ‘जागतिक कुस्ती’साठी शैलेश शेळके याची निवड

टाका (ता. औसा) येथील शैलेश शेळकेने देशांतर्गत कुस्ती स्पर्धांमध्ये दबदबा कायम ठेवत देशभरातील मल्लांना धूळ चारली आहे.
Shailesh Shelake
Shailesh Shelakesakal

उजनी - टाका (ता. औसा) येथील शैलेश शेळकेने देशांतर्गत कुस्ती स्पर्धांमध्ये दबदबा कायम ठेवत देशभरातील मल्लांना धूळ चारली आहे. पतियाळा (पंजाब) येथे शुक्रवारी (ता. २५) झालेल्या भारतीय संघाच्या निवड चाचणी स्पर्धेत ९७ किलो वजन गटात त्याने जोरदार प्रदर्शन केले. त्यामुळे भारतीय वरिष्ठ संघात त्याची निवड झाली आहे. सर्बियामध्ये होणाऱ्या ग्रीकोरोमन प्रकारातील वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तो खेळेल.

उपमहाराष्ट्र केसरी विजेत्या शैलेश राजेंद्र शेळकेने या निवड चाचणीत उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थ यादवचा १०- ३, वीरेश कुंडूचा ८-० तर पंजाबच्या सोनूचा ८-२ ने पराभव केला.

हरियानाच्या विक्रांतचा ८-४ ने पराभव करीत विजय मिळविला. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करणारा शैलेश पुण्यात सैन्य दलात कार्यरत आहे. त्यास अर्जुनवीर काका पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

जिल्ह्यातून चार खेळाडूंची निवड

यापूर्वी जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्यातून रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार व शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. कुस्तीतील या तीन दिग्गजांनंतर जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेला शैलेश हा चौथा खेळाडू आहे.

जागतिक कुस्ती स्पर्धेत संधी मिळाल्याचा आनंद आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा मानस आहे. ऑलिम्पिकच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची असल्याने सर्वतोपरी प्रयत्न असेल.

- शैलेश शेळके, उपमहाराष्ट्र केसरी विजेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com