esakal | आमदार संदीप क्षीरसागरांकडून पवारांच्या कानी शेतकऱ्यांच्या व्यथा 
sakal

बोलून बातमी शोधा

bid23.jpg

आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे मतदार संघातील विविध विकासकामांबाबत निवेदन दिले. साहेब याकडे लक्ष द्या, शेतकर्यांची अवस्था वाईट आहे, असे सांगत मदतीसाठी विनंती केली. तर शरद पवार यांनी देखील लवकर प्रश्न सोडवू असे आश्वासित केले.  

आमदार संदीप क्षीरसागरांकडून पवारांच्या कानी शेतकऱ्यांच्या व्यथा 

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : मतदार संघातील विकास कामांबरोबरच शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे साकडे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना घातले. श्री. पवार यांनी विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
श्री. क्षीरसागर यांनी बुधवारी (ता. २१) श्री. पवार यांची मुंबईत भेट घेऊन विविध मागण्या व प्रश्‍नांचे निवेदन दिले. शहरातून जाणारा कोल्हारवाडी ते जिरेवाडीपर्यंत जाणार्या महामार्ग रस्त्याचे नूतनीकरण करावे, चकलंबा - निमगाव - गारमाथा राज्य रस्ता क्रंमांक ६२ या रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रथम टप्यात घेऊन तात्काळ सुरूवात करावी, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना भरीव मदत द्यावी, आदी विविध मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. सर्व प्रश्‍न गतीने मार्गी लावू, असे आश्‍वासन शरद पवारांनी दिल्याचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हे ही वाचा अवश्य : 

शेतकरी प्रश्‍नांवर संभाजी ब्रिगेडची धरणे 
केज : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भरीव मदतीच्या मागणीसाठी गुरूवार (ता.२२) संभाजी ब्रिगेडने तहसील कार्यालयासमोर धरणे धरले. पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी पन्नास हजार रूपये नुकसान भरपाई, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा विचार करून तात्काळ पिकविमा लागू करून विमा रकमेचे वाटप करावे, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या आंदोलनात तालुकाध्यक्ष राहुल खोडसे, किरण खोडसे, अंकुश मुळे, प्रेमकुमार खोडसे, योगेश अंबाड, विशाल देशमुख, शशिकांत इंगळे, गजानन अंबाड, प्रवीण खोडसे, विष्णू थोरात, संदीप शितोळे, ऋषिकेश गलांडे, हर्षवर्धन खोडसे, संदीप थोरात, शरद खोडसे, धीरज खोडसे, शेखर थोरात,अप्पासाहेब खोडसे, दयानंद करपे, युवराज मगर व धर्मराज सोळंके सहभागी झाले होते.