अखिल भारतीय साहित्य महामंडळ
अखिल भारतीय साहित्य महामंडळsakal

शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन तर राष्ट्रपती, गडकरीच्या उपस्थितीत समारोप

उदगीर : ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

उदगीर लातुर: येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन २२ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते, तर समारोप २४ एप्रिल रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय दळणवळण व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. येथील उदयगिरी महाविद्यालयात होऊ घातलेल्या या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. या साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका अद्यापही प्रसिद्ध झालेली नाही. साहित्य महामंडळ व आयोजक संस्था यांच्या बैठकांचे सत्र सुरू असून लवकरच या कार्यक्रमाची पत्रिका प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. साहित्य संमेलन हे अवघ्या काही दिवसांवर आले असून दर्जेदार परिसंवाद उत्कृष्ट निमंत्रितांचे कविता वाचन, विशेष म्हणजे बाल महोत्सव आणि ग्रंथदिंडी या संमेलनाचे वेगळे वैशिष्ट्य राहणार आहे.

या साहित्य संमेलनात प्रथमच पर्यावरण व महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश सीमा भाग या विषयावर परिसंवादाचे आयोजन व स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून बालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे ९५ व्या साहित्य संमेलनाचे एक आगळे-वेगळे वैशिष्ट्ये ठरणार आहे.

इतिहासात प्रथमच राष्ट्रपतींची उपस्थिती

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच साहित्य संमेलनाचा समारोप राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. हा इतिहास उदगीरच्या भूमीत लिहिला जाणार असल्याने खरोखरच उदगीरच्या लौकिकात ही बाब निश्चितपणे अधोरेखित करणारी ठरणारी आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत यांची माहिती कळताच शहरातील नागरिकांसह साहित्यिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com