
खासदार शरचंद्रजी पवार साहेब हे अनुभवी नेते आहेत. राज्याच्या व देशाच्या सर्व प्रश्नांची त्यांना जाण आहे.
उमरगा (जि.उस्मानाबाद) : खासदार शरचंद्रजी पवार साहेब हे अनुभवी नेते आहेत. राज्याच्या व देशाच्या सर्व प्रश्नांची त्यांना जाण आहे. राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे कृषी, संरक्षण मंत्री म्हणुन त्यांनी केलेले कामाचे फार मोठे योगदान आहे. पवार साहेब हे पुरोगामी विचाराचे नेते आहेत, सर्वधर्म समभाव हा विचार त्यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये जोपासला अशा विचारांच्या नेत्याची देशाला, राज्याला गरज आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना ! आणि त्यांच्या हातून अशीच राज्याची, देशाची सेवा होत राहो हीच सदिच्छा ! अशी भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त केली आहे.
श्री.पवार यांच्याशी अनेक प्रसंगी भेटीचा योग आला. एक व्यक्ती म्हणून त्यांची कारकीर्द प्रेरणादायी वाटते. त्यांची कार्यशैली अजूनही तत्परतेने काम करणारी दिसते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या भेटीत त्यांनी दिलेल्या सूचनेचा आम्ही सन्मानच केला. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ते अजूनही तत्परतेने धावून येतात. ३० सप्टेंबर १९९३ च्या भूकंपानंतरच्या भयावह स्थितीत भूकंपग्रस्तांना मानसिक धैर्य देण्याबरोबरच त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी केलेली मदत आजही सर्वांच्या आठवणीत आहे, असे श्री.पाटील यांनी आवर्जून सांगितले.
संपादन - गणेश पिटेकर