सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

गंगाबेट (ता. नांदेड) येथे रविवारी (ता. १७) रोजी घडली. या प्रकरणी सासरच्या मंडळीवर नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १८) गुन्हा दाखल करण्यात आला. 

नांदेड : सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेनी जाळून घेऊन आत्महत्या केली. ही घटना गंगाबेट (ता. नांदेड) येथे रविवारी (ता. १७) रोजी घडली. या प्रकरणी सासरच्या मंडळीवर नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १८) गुन्हा दाखल करण्यात आला. 

नांदेड तालुक्यातील गंगाबेट येथे राहणाऱ्या ज्योती राधाजी सोनटक्के (वय २२) हिला सासरी नाहक त्रास देत होते. तिने जन्म घातलेली मुलगी ही अनैतीक संबंधातून झाली असे म्हणून तिचा छळ करणे सुरू केले. एवढेच नाही तर लग्नात ठरल्याप्रमाणे हुंडा मिळाला नाही. तो आता परत घेऊन ये म्हणून तिचा मानसिक व शारिरीक छळ रून अपमानीत करत. तसेच तिला उपाशी ठेवून घरातून हाकलुन देण्याची धमकी देत. या त्रासामुळे तिने शनिवारी (ता. १६) रात्री आपल्या पतीला व अन्य मंडळीला विनंती करून सांगितले की, तुम्ही जो माझ्यावर आरोप लावता तो चुकीचा असून माझे वडिल गरिब आहेत मी एवढा हुंडा देऊ शकत नाही. मला सासरी सुखाने राहू द्या अशी विनंती केली. मात्र सासरच्या मंडळीच्या वागण्यात काही फरक पडला नाही. 

शेवटी रविवारी ( ता १७) पहाटे दोनच्या सुमारास आपल्या राहत्या घरी अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. तिला सासरच्या मंडळीनी विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. परंतु गंभीर भाजल्याने तिचा उपचारादरम्यान रविवारी (ता. १७ ) दुपारी बाराच्या सुमारास वार्ड क्रमांक नऊमध्ये मृत्यू झाला. यानंतर तिच्या माहेरच्या मंडळीनी रुग्णालयात धाव घेतली.

मुलीचा मृतदेह पाहून आई- वडिलांनी हंबर्डा फोडला. उत्तरीय तपासणीनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार झाले. सोमवारी (ता. १८) ज्योती राधाजी सोनटक्के हिच्या मृत्यूपूर्व जबाबावरून पती राधाजी प्रभाकर सोनटक्के, सासु लक्ष्मी उर्फ सुशिला प्रभाकर सोनटक्के आणि अनिता सोनटक्के या तिघांवर नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात मरणास कारणीभूत 
रल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. यु. थोरात करित आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या फरार असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे तपासीक अमलदार श्री. थोरात यांनी सांगितले.   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An 'she' shook her life