शेख सलीम एक वर्षासाठी स्थानबध्द

शेख सलीम एक वर्षासाठी स्थानबध्द

परभणी : जिंतूर शहरात दहशत पसरविणाऱ्या व गुंड प्रवृत्तीचा शेख सलीम शेख लतीफ (वय 50) यास एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.4) दिले. 

जिंतूर शहरात स्वताची दहशत पसरविणारा इसम शेख सलीम शेख लतीफ (रा.नेवाती मोहल्ला) याच्या हालचालीवर पोलिसांचे बारीक लक्ष होते. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, गैर कायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, शासकीय नौकरावर हल्ला करणे, शिवीगाळ करणे, धमकावणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.

त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तरीही त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिस ठाणे जिंतूर यांच्यामार्फत एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्फत पोलिस अधिक्षकांना सादर करण्यात आला. पोलिस अधिक्षकांनी रितसर पडताळणी करून सदर प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी परभणी याच्याकडे दिला होता. यावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शेख सलीम शेख लतीफ यास स्थानबध्द करून वाशिम कारागृहात ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. आदेश प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखा व जिंतूर पोलिसांनी शेख सलीम शेख लतीफ यास गुरुवारी ताब्य़ात घेवून त्याची वाशीम कारागृहात रवानगी गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com