वर्षअखेर शेंद्रातील कामे पूर्ण - गजानन पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

औरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीची (ऑरिक) शेंद्रामध्ये सुरू असलेली विकासकामे डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करणार असल्याचा विश्वास औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडचे (एआयटीएल) सहसरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शेंद्रा येथील साइट ऑफिसमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

औरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीची (ऑरिक) शेंद्रामध्ये सुरू असलेली विकासकामे डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करणार असल्याचा विश्वास औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडचे (एआयटीएल) सहसरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शेंद्रा येथील साइट ऑफिसमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

शेंद्रा येथे दोन रेल्वे ओव्हरब्रिज, पायाभूत सुविधा, फायर हायड्रंट आणि ऑरिक हॉलची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार अाहेत. रस्त्यांचे, पाण्याचे आणि वीज वितरणाचे मोठे जाळे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कामांनी वेग घेतला असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. ह्योसंग या अँकर प्रकल्पाचे कार्यालयही तयार करण्यात आले असून मे २०१९ पर्यंत उत्पादन करण्याची या कंपनीची तयारी असल्याचे ते पुढे म्हणाले. विभागीय अधिकारी सोहम वायाळ, किसनराव लवांडे, विष्णू लोखंडे आदींची उपस्थिती होती.

अशी आहेत विकासकामे
 ह्योसंगचे तात्पुरते कार्यालय तयार, कोरियन चमू कार्यरत. 
 रस्ते, जलशुद्धीकरणातून बाहेर पडलेले पाणी साठवण्याची यंत्रणा.
 जुलैपर्यंत पहिला रेल्वे ओव्हरब्रिज खुला करणार, डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार. 
 दुसरा ओव्हरब्रिज ऑरिकला समृद्धीशी जोडणारा. 
 ऑरिक हॉलमध्ये कमांड कंट्रोल यंत्रणा, ऑक्‍टोबरपर्यंत हॉल सज्ज. 
 १२९ कोटींच्या ऑरिक हॉलमध्ये २०० सीसीटीव्ही. 
 सिव्हिल वर्क पूर्ण, फर्निचरच्या निविदा आगामी महिन्यात. 
 फायर फायटिंग नेटवर्कचे विस्तीर्ण जाळे. 
 ह्योसंगसह प्लॅनची देवाणघेवाण, व्यवस्थापकीय संचालकांची भेट. 
 बिडकीनचे काम नियोजित वेळेपेक्षा एक महिना पुढे. 
 मेपर्यंत २० टक्‍क्‍यांचे टार्गेट, १८ टक्‍के काम पूर्ण. 
 रशियन, जपानी, चिनी, कोरियन कंपन्या संपर्कात. 
 बंगलो प्लॉटसाठी ९६० रुपये दर. एकरकमी भरल्यास ९५ वर्षांचा करार. 
 ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या माध्यमातून महसूल मिळणार.
 ११ हजार कोटींचा एकूण प्रकल्प, ८ हजार कोटी सुविधांवर.

Web Title: shendra work complete gajanan patil