leopard cage
sakal
शेंदूरवादा - गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा व परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सहा दिवसांपूर्वी गुरुवारी (ता. 23) सायंकाळी सोमनाथ वल्ले यांच्या शेतवस्तीवरील घराजवळ वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असला, तरी अद्याप बिबट्या पकडला न गेल्याने ग्रामस्थांमध्ये वनविभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.