Power Upgrade: शेंदूरवादा सबस्टेशनला लवकरच १० एमव्हीएचे रोहित्र; मंगेगाव फिडरलाही मंजुरी

शेंदूरवादा सबस्टेशनला १० एमव्हीएचा नवीन रोहित्र, मंगेगाव फिडरला मंजुरी; शेतकऱ्यांना दर्जेदार व अखंड वीजपुरवठ्याचा मार्ग मोकळा
A new 10 MVA transformer and Mangegaon feeder have been approved to strengthen power supply in the Shendurwada area.

A new 10 MVA transformer and Mangegaon feeder have been approved to strengthen power supply in the Shendurwada area.

Sakal

Updated on

शेंदूरवादा : गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वाढत्या वीज तक्रारी आणि वीजपुरवठ्यातील अडचणी सोडविण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी शनिवारी (ता. १३) महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. वीजपुरवठ्याशी संबंधित पायाभूत सुविधांची कामे करताना काही अडचणी येत असल्यास त्याची माहिती द्यावी. कोणाकडून विकासकामे अडविली जात असल्यास संबंधित अधिकारी व व्यक्तींशी समन्वय साधून प्रश्न सोडविण्यासाठी मदत केली जाईल, असे आमदार बंब यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com