esakal | बीडमध्ये शेतकरी प्रश्नांवर शेकापचे अर्धनग्न आंदोलन | Beed News
sakal

बोलून बातमी शोधा

बीड : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शुक्रवारी (ता.आठ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न धरणे आंदोलन करण्यात आले.

बीडमध्ये शेतकरी प्रश्नांवर शेकापचे अर्धनग्न आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी कामगार पक्षाच्या (Shetkari Kamgar Paksha) वतीने शुक्रवारी (ता.आठ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य व केंद्र सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, एफआरपी एकरकमी द्यावी, मागच्या वर्षीचा पीकविमा तत्काळ द्यावा, नदीकाठच्या पूरग्रस्त भागातील (Beed) गावांचे पुनर्वसन करावे, शेतकऱ्यांचे पीक कर्ज व शेतीपंपाचे दोन वर्षांचे विज बील माफ करावे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: पालकमंत्री देसाईंचा दौरा वाऱ्यावरची वरात, तासाभरात नुकसान पाहणी

आंदोलनात मोहन गुंड, अॅड नारायण गोले, अॅड. संग्राम तुपे, अर्जुन सोनवणे, भीमराव कुटे, नाना पावार, नवनाथ जाधव, अमोल सावंत, प्रशांत चाटे, मुंजाबा पंचाळ, बलभीम भगत, गणेश कदम, सुदाम चव्हाण, विलास मुंडे, बालू इतापे, मुकुंद शिंदे, रईस शेख, मुकुंद खेत्री, अनंत चव्हाण सहभागी झाले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

loading image
go to top