esakal | पालकमंत्री देसाईंचा दौरा वाऱ्यावरची वरात, तासाभरात नुकसान पाहणी | Subhash Desai Visit Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांची पाहणी करुन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी संवाद साधला.

पालकमंत्री देसाईंचा दौरा वाऱ्यावरची वरात, तासाभरात नुकसान पाहणी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मोबीन खान । सकाळ वृत्तसेवा

वैजापुर (जि.औरंगाबाद) : गोदावरी, ढेकु व शिवना नदीला आलेल्या महापूर व अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेतजमिनीत पाणी शिरले, पूरामुळे जनावरांचा चारा वाहून गेला. शेतकऱ्यांवर डोंगराएवढं संकट कोसळलं. यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यात आडवळणाच्या गावाला टाळून रस्त्यालगतच्या गावात नाममात्र पाऊल टाकायचे, असा प्रकार पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी गुरूवारी (ता.सात) वैजापूर (Vaijapur) तालुक्यात केला. अवघ्या एक तासात पालकमंत्र्यांनी राहेगाव, सोनवाडी व लासुरगाव या तीन ठिकाणांची सायंकाळी ६ वाजेनंतर पाहणी करून काढता पाय घेतला. या सर्व प्रकारामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीस (Aurangabad) आलेले पालकमंत्री देसाई गुरुवारी सायंकाळी ६ वाजता वैजापुर तालुक्यात आले.

हेही वाचा: 'भाजप,शिवसेनेने राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करावी'

साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांनी राहेगाव, सोनवाडी व लासुरगाव शिवारात पाहणी केल्यानंतर पालकमंत्री वैजापुर शहराकडे रवाना झाले. यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शेतपिकांसह पशुधनाचेही नुकसान झालेले आहे. झालेले नुकसान आर्थिक मदत देऊन भरुन येईल, असे नाही. मात्र, शेतकऱ्यांना धीर देऊन शासन सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी देसाई यांना तालुक्यात कापूस, मका, तुर, बाजरी, मुग, भूईमूग, सोयाबीन व फळबाग यासह भाजीपाल्याचे क्षेत्रांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. अतिवृष्टीमुळे सोनवाडी गावातील अनेक घरात पाणी शिरले होते. पालकमंत्री देसाई यांनी लासूरगाव पुरामुळे बाधित व स्थलांतरीत झालेल्या कुटुंबियांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार अंबादास दानवे, आमदार प्रा.रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, तहसीलदार राहुल गायकवाड उपस्थित होते.

हेही वाचा: शिव्याशापाने विकास होत नाही,अशोक चव्हाण यांनी विरोधकांना सुनावले

loading image
go to top