

Shirur Kasar Drought
esakal
शिरूर कासार : पावसाने पाठ फिरवल्याने शिरूर कासार तालुक्यात भीषण दुष्काळाचे सावट पसरले आहे. शेतशिवारातील हिरवळ पूर्णपणे करपली असून, पिण्याच्या पाण्यासोबतच मुक्या जनावरांच्या चार्याचा प्रश्न अत्यंत विदारक बनला आहे.
गोठ्यात हंबरणाऱ्या जनावरांना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळत असतानाच, बावी येथील पशुधनासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेले व्यावसायिक विठ्ठल मोरे खऱ्या अर्थाने संकटमोचक ठरले आहेत.
गाव सोडले, पण गावाला सोडले नाही या उदात्त भावनेतून त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून गावाकडील मुक्या जिवांसाठी तब्बल १५० टन चारा उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य संकल्प केला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ म्हणून पहिल्या टप्प्यात ३ टन ५०० किलो ऊसाचा चारा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला.
गेल्या १८ वर्षांपासून पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत मोरे यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुरवातीला मोठा संघर्ष करून जिद्दीच्या जोरावर त्यांनी आर्थिक यश मिळवले.
मात्र, आपल्या गावाकडची माती आणि शेतकरी बांधवांशी असलेली नाळ जराही तुटलेली नाही. त्यांनी आपल्या यशाचा काही वाटा या गावकऱ्यांच्या मदतीसाठी खर्च करण्याचा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.