India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

India to Face New Zealand in ODI, Test and T20I Series : न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी मालिकेच्या तयारीसाठी काही प्रमुख खेळाडूंना एकदिवसीय मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते, असे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संकेत दिले.
India New Zealand Tour

India New Zealand Tour

esakal

Updated on

नवी दिल्ली : आगामी न्यूझीलंड दौऱ्यात प्रतिष्ठा पणास लागू शकणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी याच दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतून काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, असे संकेत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिले आहेत. ५० षटकांचे सामने खेळल्यानंतर लगेचच कसोटी सामन्यासाठी सज्ज होणे आव्हानात्मक असते, हा मुद्दा गंभीर यांनी अधोरेखित केला.

न्यूझीलंडमध्ये भारतीय संघ एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. या प्रदीर्घ दौऱ्याचे वेळापत्रक पाहता भारतीय संघ १९ नोव्हेंबर रोजी वेलिंग्टन येथे पहिली कसोटी खेळणार आहे. त्याच्या केवळ तीन दिवस आधी टॉरंगा येथे न्यूझीलंडविरुद्ध पाचवा आणि अंतिम एकदिवसीय सामना होणार आहे. या प्रदीर्घ दौऱ्यात तिन्ही प्रकारांत मिळून १२ सामने खेळले जाणार आहेत.

India New Zealand Tour
Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

भारताच्या घरच्या हंगामाच्या पूर्वसंध्येला ‘जिओस्टार’शी बोलताना गंभीर म्हणाले, ‘‘कसोटी सामन्यांच्या तयारीसाठी अनेकदा फलंदाजांना पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांती द्यावी लागते आणि त्यांना कसोटी क्रिकेटकडे वळावे लागते. टी-२० मधून एकदिवसीय क्रिकेटमध्ये येणे तुलनेने सोपे आहे.’’

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी सरावासाठी केवळ दोन दिवस मिळणार असल्याने कर्णधार शुभमन गिल, के. एल. राहुल, सलामीवीर यशस्वी जैस्वाल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज, अष्टपैलू रवींद्र जडेजा तसेच नितीशकुमार रेड्डी यांच्यापैकी काही प्रमुख खेळाडूंना एकदिवसीय मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते.

निवड समिती आणि प्रशिक्षकांचा आग्रह कितीही असला तरी भविष्यात तिन्ही प्रकारांत खेळणारे खेळाडू फारच कमी राहतील, असे गंभीर यांना वाटते. हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्य खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रशिक्षकासाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी तिन्ही प्रकारांत खेळणे अत्यंत महत्त्वाचे असते.

म्हणूनच प्रशिक्षकाला किंवा निवड समितीला कितीही इच्छा असली आणि त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी आगामी काळात तिन्ही प्रकारांत खेळणारे खेळाडू फारच कमी असतील. परिणामी, अशा खेळाडूंना आलटून-पालटून वापरावे लागेल. मग ते फिरकी गोलंदाज असोत किंवा वेगवान गोलंदाज,’’ असेही गंभीर यांनी स्पष्ट केले.

कसोटी क्रिकेटचे महत्त्व अधिक ठळक करताना गंभीर म्हणाले, ‘‘नवोदित खेळाडूंना संघात आणताना त्यांना कसोटी क्रिकेट किती महत्त्वाचे आहे, हे जाणवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. कसोटी क्रिकेटमध्ये प्रभुत्व गाजवणारा देश क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत असतो, असे माझे ठाम मत आहे. याउलट, टी-२० क्रिकेटमध्ये बलाढ्य असलेला देश क्रिकेटमध्ये श्रेष्ठ असतो, असे मी कधीही मानलेले नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटला अजूनही आमचे प्राधान्य आहे.’’

India New Zealand Tour
Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

विश्वकरंडक आणि संघाची जुळवाजुळव

घरच्या मैदानावर होणाऱ्या आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांपासून भारत पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेची तयारी सुरू करणार आहे, मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागामुळे जसप्रीत बुमरा उपलब्ध नसेल, तर हार्दिक पंड्या अद्याप एकदिवसीय सामन्यात १० षटके गोलंदाजी करण्याइतका पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही.

२०२७ मधील विश्वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने बुमरा आणि हार्दिक हे दोन्ही अनुभवी खेळाडू भारताच्या एकदिवसीय संघरचनेत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे गंभीर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com