लातूर शहर झाले भगवेमय, शिवजयंती उत्साहात साजरी

Shivjayanti Latur
Shivjayanti Latur

लातूर ः हातात भगवा ध्वज, शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले झेंडे, उत्साहाच्या वातावरणात हजारो मोटारसायकलस्वारांनी शहरातून फेरी काढली. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने लातूर नगरी दुमदुमून गेली होती. निमित्त होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे. बुधवारी (ता.१९) सर्व लातूर शहर भगवेमय झाले होते. सळसळत्या तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. शहरात ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


गेल्या काही दिवसांपासून विविध संघटनांच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या जयंतीची तयारी केली जात होती. बुधवारी सकाळपासूनच येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरवात केली होती. सकाळी दहाच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिरापासून मोटारसायकल फेरीला सुरवात झाली. हजारो मोटारसायकलस्वार या फेरीत सहभागी झाले होते. भगवे फेटे, भगवे शर्ट, हातात भगवाध्वज घेऊन तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेकडो तरुणांच्या हातात शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेले झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. नवीन रेणापूर नाका, शिवाजी चौक, अशोक हॉटेल, मुख्य रस्ता, गांधी चौक, गंजगोलाई पुन्हा याच मार्गाने राजीव गांधी चौक, बार्शी रस्ता अशा शहरातील प्रमुख मार्गावरून ही मोटारसायकल फेरी काढण्यात आली. यात युवतींचा सहभागही लक्षणीय होता. ठिकठिकाणी या फेरीचे स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आली होती. दुपारी दोनपर्यंत ही फेरी शहरात फिरत होती. त्यामुळे लातूर भगवेमय झाले होते. या फेरीत सहभागी झालेले तरुणांनी दिलेल्या जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी लातूर दुमदुमून गेले होते. ही मोटारसायकल फेरी पाहण्यासाठी नागरिकांची दुतर्फा गर्दी होती. अनेक जणांनी शिवाजी चौकातील उड्डाणपुलावर उभारून या फेरीचा आनंद घेतला.


पालकमंत्र्यांकडून अभिवादन ः शिवजयंतीच्या निमित्ताने बुधवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी महाराजांना अभिवादन केले. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे, नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, श्‍याम जाधव, सुपर्ण जगताप, सिकंदर शेख आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सायकल वाटप ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवजयंतीनिमित्त गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या. येथील शिवाजी चौकात हा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या हस्ते सायकलीचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, बबन भोसले, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव गजानन खमीतकर, निशांत वाघमारे, रेखा कदम, मनीषा कोकणे, पूजा गोरे, बाळासाहेब जाधव, ताज शेख, मुन्ना तळकेर, विशाल विहिरे, बसवराज रेकुलंगे, जितेंद्र गायकवाड, समीर शेख, सदाम पटेल, इर्शाद शेख, टिल्लू शेख, जहागीर शेख, आशिष हाजगुडे, कबीर शेख, खमर काझी, नागनाथ पाटील, राम रायवार आदी उपस्थित होते.


महापालिकेत शिवजयंती ः येथील महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा आयुक्त जी. श्रीकांत, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती दीपक मठपती, सुरेश पवार, रविशंकर जाधव, राजा मणियार, गुरुनाथ मगे, देविदास काळे, आयुब मणियार, देवानंद साळुंके, प्रवीण आंबुलगेकर, मनोज सूर्यवंशी, दीपा गीते, रागिणी यादव, वर्षा कुलकर्णी, स्वाती जवळगे (घोरपडे), श्वेता लोंढे, महानगरपालिकेचे उपायुक्त संभाजी वाघमारे, सहायक आयुक्त सुंदर बोंदर, वसुधा फड, मुख्यलेखाधिकारी प्रभाकर डाके, मुख्य लेखापरीक्षक तुकाराम भिसे, पाणीपुरवठा अभियंता विजय चोळखणे, आस्थापना प्रमुख रमाकांत पिडगे, संतोष लाडलापुरे, शिक्षणाधिकारी दामाजी सोनफुले, सुनील चनवडे, विजय शेटे, रुकमानंद वडगावे, महेश शर्मा,अशोक पिसाळ, सविता निर्गुडे, वृंदावनी पवार, विजया बिडवई उपस्थित होत्या.

मुस्लिम बांधवांकडून अभिवादन ःछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मुस्लिम बांधवांकडूनही साजरी करण्यात आली. येथे एका कार्यक्रमात महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खदिर मणियार, अब्दुल समद शेख, डॉ. ताहेर शेख, अजहर सय्यद, जमील नाना आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com