Shiv Jayanti | निलंग्यात शिवरायांच्या विश्वविक्रमी तैलचित्राचे अनावरण

तैलचित्राच्या निर्मितीसाठी मागील १५ दिवसांपासून काम सुरु होते.
Shivaji Maharaj News
Shivaji Maharaj Newsesakal
Updated on

निलंगा (जि.लातूर) : येथे साकारण्यात आलेल्या ११ हजार चौरस फुटाच्या विश्व विक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या तैलचित्राचे लोकार्पण माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला संपन्न झाले. अक्का फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीच्या (Shiv Jayanti) निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. शिवजयंतीनिमित्त निलंगा येथे दरवर्षी नव्या संकल्पना राबविण्यात येतात. या तैलचित्राच्या निर्मितीसाठी मागील १५  दिवसांपासून मंगेश निपाणीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. यासाठी ४५० लिटर ऑइलपेंट वापरण्यात आले आहे. रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता.१८) दीपप्रज्वलन करून तैलचित्राचे अनावरण पार पडले. (Shiv Jayanti News Updates Oil Paint Sketch Of Shivaji Maharaj Unveil In Nilanga Of Latur)

Shivaji Maharaj News
पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने मुलाचा राग अनावर, जन्मदात्या आईचा आवळला गळा

यावेळी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar), भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भारतबाई साळुंके, कृषी सभापती गोविंद चिंलकूरे, पंचायत समितीच्या सभापती राधाताई बिराजदार, निलंगा (Nilanga) नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे! उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शाहूराज शेटे, शहराध्यक्ष वीरभद्र स्वामी, शिवजयंती महोत्सव समितीचे डॉ लालासाहेब देशमुख, शेषराव ममाळे, दत्ता शाहीर, एस. एस. शिंदे, किरण बाहेती, सय्यद इरफान, पाशामियाँ आतार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. आज शनिवारी (ता.१९) शिवजयंतीनिमित्त रक्तदानाचा महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. यासाठी एक घर एक रक्तदाता संकल्पना राबविण्यात येत आहे. यापासून हजारो युवकांना प्रेरणा मिळत राहील, असे आमदार निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. (Latur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com