Mohan Bhagwat : छत्रपती शिवाजी महाराजांना डॉ. भागवतांकडून अभिवादन

शिवजयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले.
Mohan Bhagwat
Mohan Bhagwatsakal

लातूर : शिवजयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. संघाचे संजय अग्रवाल, हुकूमचंद्र कलंत्री, शिरीष कुलकर्णी, तुकाराम पाटील, डॉ. कल्याण बरमदे आदी उपस्थित होते. येथील विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या विवेकानंद कर्करोग आणि सुपर स्पेशालिटी विस्तारित रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा डॉ. भागवत यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. २०) होत आहे. त्यानुसार सोमवारी ते शहरात आले.

केज शहरात भेट

केज : शहरातील लक्ष्मीनगर भागातील संघाचे पदाधिकारी प्रशांत वाघमारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्यासाठी डॉ. भागवत यांचे सोमवारी (ता. १९) दुपारी बाराच्या सुमारास आगमन झाले. यावेळी मुख्य रस्त्यापासूनच कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Mohan Bhagwat
Maratha Reservation: मराठा समाज मागासच, अहवाल राज्य सरकारकडून मंजूर; 10 टक्के आरक्षणाची शिफारस

चहापान व भोजन करताना वाघमारे कुटुंबीय व संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर ते लातूरकडे निघाले. यावेळी उभ्या असलेल्या संघाच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी विचारपूस केली. शाखा कशा सुरू आहेत, याबाबत चौकशी केली. वेळेअभावी आपणाशी बोलू शकत नाही, असे सांगितले.

दरम्यान, शिवजयंतीनिमित्त त्यांनी शिवरायांना अभिवादन केले. वाहनात बसण्यापूर्वी रमेश आडसकर यांनी डॉ. भागवत यांना ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देऊन परिचय दिला. डॉ. भागवत यांनी प्रथमच केज शहरात भेट दिली. सुमारे तीन-साडेतीन तास ते येथे होते. त्यांना भेटण्याची अनेकांची इच्छा होती. मात्र, वेळेअभावी ते शक्य झाले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com