मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातून औरंगाबादकडे पदयात्रा रवाना

बाबासाहेब गोंटे
Monday, 28 September 2020

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातून शिवसंग्राम संघटनेच्या वतीने सोमवारी (ता.२८) सकाळी तालुक्यातील रोहिलागड येथून औरंगाबादकडे पदयात्रा रवाना झाली.

अंबड (जि.जालना) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातून शिवसंग्राम संघटनेच्या वतीने सोमवारी (ता.२८) सकाळी तालुक्यातील रोहिलागड येथून औरंगाबादकडे पदयात्रा रवाना झाली. औरंगाबाद येथील विभागीय कार्यालय येथे जाऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. नोकर भरतीला स्थगिती देण्यात यावी.

यासह विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात येणार आहे. याबाबत अंबड तहसीलला शनिवारी(ता.२६) याबाबत निवेदन देऊन पदयात्रा काढण्यात येणार असल्याची बैठक घेण्यात आली होती. सोमवारी सकाळी अंबड तालुक्यातील  रोहिलागड  येथून शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले, बळीराम शेळके, बाळासाहेब काळवणे, रामकृष्ण टकले, योगेश भोजनेसह आदी कार्यकर्ते रोहिलागड, किनगाव, आलमगावसह आदी गावातून शिवसंग्रामचे कार्यकर्ते हातात भगवे ध्वज, अंगावर मराठा आरक्षणाच्या मागण्याचे फलक लावून रोहिलागड, डाबरुळ फाटा, थापटी, पांढरी पिंपळगाव, आपतगाव, झालटा येथून विभागीय कार्यालय येथे जाऊन निवेदन देणार आहे. गावागावांतून आता ही पदयात्रा ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहे.

मोसंबीची फळ गळती वाढत चालली; भाव चांगला, पण नुकसान सुरुच

आंदोलन अधिक तीव्र करणार
विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मराठा समाजाला आरक्षणाबाबत जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन शिवसंग्रामच्या वतीने अधिक तीव्र करण्यात येणार आहे. पालकमंत्री यांच्या अंबड येथील संपर्क कार्यालया समोर ढोल बजाव करण्यात येणार आहे, असे शिवसंग्राम संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले यांनी सांगितले.

तहसीलसमोर करणार ठिय्या आंदोलन
यानंतर हे आंदोलन मराठा आरक्षणासाठी शिवसंग्रामच्या वतीने सुरूच राहणार असून पुढील आठवड्यात अंबडच्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून न्याय हक्कासाठी आमचा लढा असाच पुढे राहणार आहे. गावागावांत जावून मराठा समाजाच्या तरुण युवकात जागृती करण्यात येणार आहे, असे शिवसंग्राम संघटनेचे अंबड तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब काळवणे यांनी सांगितले.

लातुरात आमदारांच्या घरासमोर हालगी वाजवून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sangram Sanghatna's Padyatra Starts For Maratha Reservation