esakal | उमरग्यात पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचा निषेध मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

shivsean morch in umarga

केंद्र शासनाच्या पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ तालुका शिवसेनेच्या वतीने शनिवारी (ता.१२) तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.

उमरग्यात पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचा निषेध मोर्चा

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद)  : केंद्र शासनाच्या पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ तालुका शिवसेनेच्या वतीने शनिवारी (ता.१२) तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावरील बाळासाहेब ठाकरे चौकातून सकाळी साडेअकराच्या सुमारास हलगीच्या कडकडाटात मोर्चाला सुरवात झाली. माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, बाजार समितीचे सभापती एम.ए.सुलतान, तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, युवा नेते किरण गायकवाड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे आदींनी मोर्चात सहभाग घेतला होता.

मोठी खुर्ची हटवून मुख्यमंत्री ठाकरे बसले साध्या खुर्चीवर, आपणही सामान्य असल्याचा दिला संदेश

यावेळी  केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या संदर्भात तहसीलदार संजय पवार यांना दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात पंजाब येथील शेतकरी गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनाबाबत रावसाहेब दानवे यांनी या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन व पाकिस्तान चा हात असल्याचे बेताल वक्त्यव्य केले आहे. त्याचा निषेध करीत असल्याचे नमूद केले. आंदोलनात जिल्हा परिषदेचे सदस्य शेखर घंटे, महिला आघाडीप्रमुख मीनाक्षी दुबे,ज्योती माने, सुधाकर पाटील, विलास भगत,  बलभीम येवते, शहरप्रमुख राजेंद्र सुरवसे, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, अजित चौधरी,  संदीप चौगुले, रणधीर पवार, खयूम चाकूरे,  योगेश तपसाळे, शरद पवार, गोपाळ जाधव, भगत माळी, मुजीब इनामदार, महावीर कोराळे, लिंगराज स्वामी, ज्ञानेश्वर पाटील, राम जाधव, काका गायकवाड, आप्पाराव गायकवाड, संदीप जगताप यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Edited - Ganesh Pitekar

loading image