बंब यांच्या गावात शिवसेनेचे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

औरंगाबाद - शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे या मागणीसाठी शिवसेनेने आज गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या लासूर स्टेशन गावात जाऊन आंदोलन केले. शेतकरी कर्जमुक्तीसाठी मोठी बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची मोहिम शिवसेनेने हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरवात "शेतकऱ्यांना कर्जमाफी अजिबात देऊ नका' अशी खळबळजनक मागणी विधानसभेत करणाऱ्या आमदार बंब यांच्या गावातूनच केल्याने शिवसेनेने भाजपवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे. 

कॉंग्रेससह राज्यातील विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा कालपासून सुरू झाला असतानाच शिवसेनेने देखील संपुर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी गावागावात जाऊन आंदोलन सुरू केले आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगांवकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 1 वाजता लासूर स्टेशन येथील बाजारपेठेत भर उन्हात शिवसेनेने आंदोलन केले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपुर्ण कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवसेनेच्या आवाहनानंतर शेतकरी देखील या कर्जमुक्तीच्या आंदोलनात सहभागी झाले होते. 

Web Title: Shiv Sena movement