

Uddhav Thackeray slams government’s farmer package
sakal
पाचोड : शेतकऱ्यांशी संवाद साधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'गेल्या आठवड्यात शेतकरी एकवटला, त्यातून काहीतरी होईल असे मला वाटले.परंतु मुख्यमंत्र्यांनी परत एकदा कोपऱ्याला गुळ लावला अन् तीस जून तारीख दिली. शेतकऱ्यांत कर्ज फेडण्याची ताकद नाही उरली. शेतकऱ्यांच्या जमीनी, पिके खरडून गेले, त्यात मातीऐवजी दगडं राहीलीत, सरकारने त्यांना दिलेले पॅकेज ही थट्टा आहे,पीक विम्याचे ४० ते ५० हजार रुपये मिळायला हवे होते. मोसंबीला ८० हजार रुपये मिळायला हवे होते. कापसाला आणखी काही वेगळे हवे होते. परंतु पीक विम्याचे अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन रुपये, तीन रुपये मिळाले. पालघरमध्ये अडीच रुपये मिळाले. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे.