महापालिका स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे राजू वैद्य यांनी बाजी मारली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

औरंगाबाद : महापालिका स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे राजू वैद्य यांनी अखेर बाजी मारली. ११ विरुद्ध शून्य मतांनी त्यांनी दणदणीत विजय मिळविला. एमआयएम पक्षाचे उमेदवार व सदस्य उशिरा आल्याने त्यांना मतदान करता आले नाही.

महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य असून, त्यात शिवसेना-भाजपचे वर्चस्व आहे. मात्र शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले गजानन बारवाल यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. शनिवारी (ता.1) शेवटी युतीतर्फे निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार सकाळी दहा वाजता मतदानाला सुरवात झाली. राजू वैद्य यांना ११ मते मिळाली. त्यात शिवसेनेचे सहा, भाजप- तीन तर दोन अपक्षांचा समावेश आहे .एमआयमच्या उमेदवार शेख नर्गिस  शेख सलीम यांच्यासह चार सदस्य उशीरा आल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला.

Web Title: shiv sena's vaidya was elected as the chairman of the standing committee of municipal corporation