काय आहे शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ... मनसेने झेंडयात वापरावी का...

Aurangabad news
Aurangabad news

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यात केला आहे. परंतु, राजमुद्रेचा राजकीय कारणांसाठी वापर करणे योग्य नाही, असे म्हणत काही जणांनी कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जाणून घ्या काय आहे राजमुद्रा... 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. पाच शाह्यांच्या उरावर हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे शहाजीराजांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले आणि आपल्या या स्वराज्याची राजमुद्रा दृढ केली. 

शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना बालपणीच राजमुद्रा आणि प्रधानमंडळ देऊन त्यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले होते. या राजमुद्रेचा अर्थही तसाच आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने राजमुद्रेचा अर्थ समजून घेतला पाहिजे.

प्रतिपच्चंद्रलेखेव।
वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा
मुद्रा भद्राय राजते।।

अर्थात

‘प्रतिपदेचा चंद्र कसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला विश्ववंदनीय होतो, तशी शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्वाला भद्र, म्हणजे कल्याणकारी वाटते.’ 

मोठ्या दूरदृष्टीने ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि ध्येय यावरून सहज लक्षात यावे. हे स्वराज्य स्वसुखासाठी नसून, प्रजेच्या कल्याणासाठी आहे, असा विश्वास शिवाजी महाराजांनी रयतेला दिला. त्यातूनच ही राजमुद्रा विश्ववंद्य झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com