Jalna News | शिवरायांचा पुतळा रात्रीतून हटविला, वीस जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रशासनाने रात्री हटविला
Crime News
Crime Newssakal media

जालना : तालुक्यातील सेवली येथे काही शिवप्रेमींनी सोमवारी (ता.१४) रात्री स्थापन केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रशासनाने मंगळवारी (ता.१५) रात्री हटविला आहे. शिवाय वीस जणांवर गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याच भागातील एक वडाच्या झाडाखाली रवलेले हिरवा झेंडा ही काढण्यात आला असून या प्रकरणी २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना (Jalna) तालुक्यातील सेवली गावाच्या चौकात काही शिवप्रेमींनी सोमवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना केली होती. मात्र, हा पुतळा स्थापना करताना प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे मंगळवारी (ता.१५) सकाळपासूनच प्रशासनाची धावपळ सुरू होती. (Shivaji Maharaj Statue Remove From Sevali In Jalna District, Cases Filed Against 20 Peoples)

Crime News
बाळासाहेब थोरातांनी दिली अब्दुल सत्तारांच्या आदेशास स्थगिती

गावात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंगळवारी (ता.१५) दिवसभर सेवली येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात होता. तसेच हा पुतळा हटविण्याच्या चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू होत्या. त्यामुळे अमरावतीनंतर जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रशासनाकडून सावध पावले उचलत मंगळवारी (ता.१५) रात्री सेवली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्थापन करण्यात आलेला अश्वरुढ पूर्णकृती पुतळा हटविण्यात आला आहे. शिवाय वीस जणांवर ग्रामसेवक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या भागात एक वडाच्या झाडाखाली हिरवा झेंडा लावून टिपू सुलतान जिंदाबाजच्या घोषणा देणाऱ्या २० ते २५ जणांविरोधात ही ग्रामसेवक यांच्या फिर्यादीवरून सेवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सेवली येथे शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे.

Crime News
बर्फात ताजमहाल ! पर्यटकांसाठी बनले आकर्षण केंद्र

वाटुर शिवप्रेमी कडुन कडकडीत बंद

वाटुर (जि.जालना) : सेवली (जि.जालना) येथील मंगळवारी (ता.१४) रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्थापन करण्यात आलेला अश्वारूढ पुतळा प्रशासनाने हटविला. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ बुधवारी (ता.१६) वाटूर कडकडीत बंद पाळण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com