11 वे शिवार साहित्य संमेलन; ग्रंथदिंडीने वेधले गावकऱ्यांचे लक्ष 

Majalgaon
Majalgaon

माजलगाव : तालुक्यातील घळाटवाडी येथे होत असलेल्या ११व्या शिवार साहित्य संमेलनाची सुरूवात मृदंगाचार्य भरत महाराज पठाडे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करूनआज ता, 28 रविवारी करण्यात आली. 

या ग्रंथदिंडीमध्ये जि. प. प्राथमिक शाळेच्या कलशधारी मुली, लेझीम पथक, हालगी पथक,  ढोल पथक, भजनी मंडळी सहभागी झाले होते. प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी ग्रंथाचे पूजन करण्यात आले.

या ग्रंथदिंडीमध्ये संमेलनाध्यक्ष प्रा. रामप्रसाद तौर, स्वागताध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, अनुप घाडगे, गणेश जाधव, राजेंद्र भोसले, मुकुंदराज सोळंके, प्रा. स्नेहल पाठक, भाऊसाहेब राठोड, किशोर गुंजकर, बालासाहेब झोडगे,सुशील धसकटे, गौरी देशमुख, प्रेमा कुलकर्णी,स्मिता लिंबगावकर, नीळकंठ जाधव,शहाजी वाहुळे, शिवप्रसाद भंडारी, राजकन्या काबरा, जीवन डोंगरे,विष्णू झोंबाडे, नारायण चौधरी, कुंडलिक  गवळी, नामदेव पवार, दिनकर जाधव, अनुरथ लांबुड, संतराम काटे, विक्रम भोसले यांच्यासह सर्व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून ग्रंथदिंडीचा समारोप करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com