डॉ.गंगाधर पानतावणेंच्या सल्ल्यानेच शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग- रामदास आठवले 

अनिलकुमार जमधडे
गुरुवार, 28 जून 2018

औरंगाबाद : 'राजकारणात विचारधारेच्या विरोधातही निर्णय घ्यावे लागतात' असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी दिला होता. म्हणूनच शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करत शिवसेनेबरोबर युती केली असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.

डॉ. गंगाधर पानतावणे अभिवादन आणि अस्मितादर्श अर्धशतक पूर्ती समारंभ सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योजक मधुकर अण्णा मुळे होते. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, योजना आयोगाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रेमानंद गज्वी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी गंगाधर पानतावणे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

आंबेडकरी विचारधारेला वाहून घेतलेले डॉ. गंगाधर पानतावणे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आंबेडकरी साहित्य रुजवण्यासाठी काम केले. त्यांच्या अस्मितादर्शने अनेक लेखक साहित्यिक, कवी, कथाकार घडवले. आंबेडकरी चळवळीला ताकद देणारा हा साहित्यिक समाजासाठी आणि आमच्यासाठी आवश्यक होता. मात्र त्यांच्या अकाली निधनाने मोठी हानी झाली अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. बी. जगतपुरिया या यांनी केले. कार्यक्रमाला रिपाईचे कार्यकर्ते पक्षाचे नेते आणि साहित्यिकांची उपस्थिती होती.

Web Title: shivashakti bhimashakti together said ramdas athavle