esakal | लातूरच्या एलसीबी पथकाचा उदगीरात छापा
sakal

बोलून बातमी शोधा

Gambling police action

लातूरच्या एलसीबी पथकाचा उदगीरात छापा

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर : लातूरच्या एलसीबी पथकाने उदगीरच्या अडत लाईन भागात बुधवारी (ता.१) रात्री साडे आठच्या सुमारास छापा टाकून तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या चौदा आरोपींना अटक करून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा: हिंगोली जिल्हा परिषद महाआवास अभियानामध्ये विभागात तृतीय

याबाबत शहर पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की उदगीरच्या अडत लाईन भागात बलभीम नाईक यांच्या इमारतीतील एका बंद रूममध्ये मोठ्या स्वरुपाचा क्लब चालू असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानंतर लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या पथकाने सापळा रचून बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास छापा टाकून तिरट नावाचा जुगार खेळत असलेल्या १४ जणांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडील रोख रक्कम, साहित्य असा एक लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शहर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: 'मतदारसंघात 100 टक्के लसीकरण झाल्याशिवाय मुंबईला जाणार नाही'

यावेळेत तिरट नावाचा जुगार खेळत असलेले अविनाश गायकवाड (रा.रोहीदास सोसायटी), मनोज बिबराळे (रा. हनुमान कट्टा), सुभाष काळा (रा. शेटकार गल्ली) प्रसाद तानशेट्टे (रा. सराफ लाइन), मारुती वरदाळे (रा. विकास नगर), विशाल हिप्पळगे (रा.हनुमान कट्टा), मारुती सोमवंशी (रा. निडेबन), बाळू राठोड (रा. मल्लापूर) सुरेश आलमकीरे (रा. हनुमान कट्टा), अक्षय पाटील (शाहू चौक शिवाजी सोसायटी) संतोष मठपती (रा.बिदर गेट) गंगाराम मोरारीकर (रा.रेल्वे स्टेशन रोड) गणेश हंगरगे (रा.आनंदनगर) प्रफुल्ल गजरा (रा बिदर नाका) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर शहरात चालेलल एवढ मोठ जुगाराचे रॅकेट उदगीर पोलिसांना का माहिती झाले नाही? शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. उदगीर शहरात पोलिस ठाणे असताना लातूरच्या पोलिसांना येवुन उदगीरात छापा मारावा लागतो यापेक्षा उदगीर करांच मोठ दुर्दैव काय आहे? अशीही चर्चा येथील नागरिक करत आहेत.

हेही वाचा: रूग्णवाहिकेच्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू; केज तालुक्यातील घटना

देगलूर रोडचा नंबर कधी?

शहरातील जुगार अड्ड्यावर लातूर पोलिसांनी छापा मारला पण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील देगलूर रोडवरील आप्पाराव चौकाजवळील एका वसाहतीत सुरू असलेल्या मोठ्या स्वरूपाच्या क्लब वर लातूर पोलिस छापा कधी मारणार? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. फक्त शहरात कारवाई करून ग्रामीणला वाऱ्यावर सोडण्याचे काम लातूर पोलीस करतात किं देगलूर रोड वरील त्या क्लब वर छापा टाकून पकडतात हे आता येणाऱ्या काळात दिसणार आहे.

loading image
go to top