शिवसेना-भाजपचं चाललंय काय? हातात हात, पायात पाय!

Chandrakant-and-Atul
Chandrakant-and-Atul

औरंगाबाद - शिवसेना-भाजपचे शहरात एकत्रित राजकारण नगरपालिकेची महापालिका झाल्यापासून आजतागायत सुरू आहे. लहान भाऊ मानून घेत शिवसेनेचे बोट धरून चालणारा भाजप २०१४ मध्ये मोठा झाला आणि आता आम्ही मोठा भाऊ अशी भूमिका घेणे सुरू केले. तेव्हापासून शहर व जिल्ह्यात शिवसेना-भाजप आपापले अस्तित्व जपण्याचा येनकेन प्रकारे प्रयत्न करीत आहेत. असे असले, तरी सध्या जिल्ह्यात शिवसेना-भाजपची अवस्था ‘धरलं तर चावतंय अन्‌ सोडलं तर पळतंय’ अशी झाली आहे. आदळआपट होत असली तरीही एकत्र नांदण्याशिवाय एकमेकांना पर्याय नाही, हे दोघांच्याही लक्षात येत असले, तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी काही सोडत नसल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत.

दसरा मेळाव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर दोन मित्रपक्ष उघडपणे समोरासमोर उभे राहिले. येथील श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा झाला. या मेळाव्यानंतर आता शिवसेना-भाजप स्वबळाच्या तयारीला लागले आहेत.

निवडणुका कधीही लागू शकत असल्याने सध्या जमेल तिथे जमेल तसे श्रेय घेण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सुरू आहे. स्वबळाची घोषणा झाली असली, तरी ऐनवेळी काय होईल हे सांगता येत नाही. स्वबळावर निवडणुका झाल्या तर आपला नंबर लागू शकतो या अपेक्षने इच्छुकांच्या आकांक्षांना पंख फुटले आहेत. यातूनच सध्या शाब्दिक चकमकी होत असल्याचे शहरवासीयांना पाहायला मिळत आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी सिडको भागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. भाजप आमदार अतुल सावे यांच्या पूर्व विधानसभा मतदारसंघात असल्याने त्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. ते नियोजित वेळेनुसार साडेअकरा वाजता आले; मात्र तिथे काहीच नव्हते. त्यामुळे परत गेले होते. 

कार्यक्रम सुरू होण्यास दीड वाजला. त्या वेळी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे येताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम उरकण्यात आला. त्यानंतर लगेच आमदार अतुल सावे तिथे आले असता, त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर चांगलेच नाराज झाले. कार्यक्रमच उरकायचा होता तर मला कशाला बोलाविले, असा सवाल करीत तीव्र नाराजी व्यक्‍त करण्याची वेळ त्यांच्यावर आणली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com