शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ अटकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

औरंगाबाद - जाळपोळप्रकरणी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांची मंगळवारी पोलिसांनी अर्धा तास चौकशी केली, त्यानंतर बंदोबस्तात त्यांना क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेऊन अटक केली. या वेळी कार्यकर्ते व नेत्यांनी जंजाळ यांच्या घरासमोर तसेच पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

या प्रकरणात शोएब अब्दुल मुनाफ (रा. राजाबाजार) यांनी तक्रार दिली. त्यानुसार 11 मे रोजी राजाबाजार भागात राजेंद्र हिंमतराव जंजाळ व त्यांचे सात सहकारी आले. त्यांनी शोएब यांच्या मोटारीची तोडफोड करून आत पेट्रोलच्या बाटल्या टाकल्या. त्यामुळे मोटारीने पेट घेतला. अशाच प्रकारे त्यांनी इतर काही वाहनांना पेटवून दिले. दंगलीत जाळपोळ करून 42 लाख, बारा हजारांची मालमत्ता पेटविल्याचा तसेच साथीदारांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप तक्रारीद्वारे करण्यात आला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. यू. सुपेकर यांनी जंजाळ यांना शुक्रवापर्यंत (ता.18) पोलिस कोठडी सुनावली.

"एमआयएम'चा नगरसेवक पसार
"एमआयएम'चा नगरसेवक फेरोजखान यांच्या नवाबपुरातील घरी सहायक आयुक्त नागनाथ कोडे व त्यांचे पथक गेले. त्यापूर्वीच फेरोजखान पसार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: shivsena corporator rajendra janjal arrested crime