चित्र रंगवा स्पर्धेत शिवसेनेचा विश्वविक्रम 

संकेत कुलकर्णी
गुरुवार, 26 जुलै 2018

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेतर्फे 'चित्र रंगवा' स्पर्धा घेण्यात आली. यात शहरातील 175 शाळांच्या तब्बल 52 हजार 500 विद्यार्थ्यांनी या सहभाग नोंदवून विश्वविक्रम केला. या विक्रमाची वंडर बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली.

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेतर्फे 'चित्र रंगवा' स्पर्धा घेण्यात आली. यात शहरातील 175 शाळांच्या तब्बल 52 हजार 500 विद्यार्थ्यांनी या सहभाग नोंदवून विश्वविक्रम केला. या विक्रमाची वंडर बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली.

शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उदघाटन शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, शिक्षणतज्ञ एस. पी. जवळकर, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परीषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी यांच्या हस्ते झाले. विभागीय क्रिडा संकुलाच्या भव्य मैदानावर 9 विभागात बैठक व्यवस्था करण्यात आली होती. या व्यवस्थेत जवळपास ३६० शिवसैनिकांची यंत्रणा कार्यरत होती. यावेळी विद्यार्थ्यांना उध्दव ठाकरे यांच्या चेहऱ्याचा मुखवटाही भेट देण्यात आला. प्रत्येक शाळेचे कलाशिक्षकही विद्यार्थ्यांसोबत होते. स्पर्धेनंतर सर्वांना दूधबिस्कीट देण्यात आले. लंडनच्या वंडर बुक ऑफ रेकॉर्डस् चे डॉ. दीपक हरणे यांनी श्री. दानवे यांना वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण 4 ऑगस्टला होणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक, राजु राठोड, कृष्णा डोणगावकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, स्थायी समिती सभापती राजु वैद्य, सभागृह नेता विकास जैन, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, महीला आघाडी सहसंपर्क संघटक सुनिता आऊलवार, जिल्हासंघटक रंजना कुलकर्णी, उपजिल्हासंघटक प्रतिभा जगताप, सुनिता देव, मध्य विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, उपशहर प्रमुख चंद्रकांत इंगळे, संजय हरणे, राजेंद्र दानवे, दत्ता पवार, प्रल्हाद शिंदे, बाळासाहेब दानवे यांची उपस्थिती होती .

Web Title: shivsena drawing competition in aurangabad