शेतकर्‍यांची पिळवणुक थांबवा, नाहीतर बँकेत घुसू; शिवसेना खासदाराचा इशारा

शेतकर्‍यांची पिळवणुक थांबवा, नाहीतर बँकेत घुसू; शिवसेना खासदाराचा इशारा

उस्मानाबाद : शेतकर्‍यांची पिळवणुक थांबवा, तो सहन करतोय पण याद राखा आमचे लोक बँकेत घुसल्यावर पळु नका असा इशारा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकार्‍यांना दिला. (ता 19) सकाळी ही बैठक घेऊन अधिकारर्‍यांना चांगलच धारेवर धरलं. विशेष म्हणजे या बैठकीला नागरीकांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत राष्ट्रीयकृत बँकानी फक्त अकराच टक्के पिक कर्ज वाटप केले आहे. यामुळ खासदार राजनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित बँक अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. या बैठकीच्या सुरुवातीलाच खासदार राजेनिंबाळकर यांनी प्रशासनासह बँक अधिकार्‍यांना फैलावर घेतले. शेतकरी व सामान्य जनतेच्या जीवावर तुमच्या बँका चालतात, तुम्ही त्यांचीच पिळवणुक करता. हे बंद झाल पाहिजे अन्यथा ही आमची लोक बँकेत घुसली तर पुन्हा पळु नका असा गर्भित इशाराच राजेनिंबाळकर यांनी दिला. यावेळीनागरीकांनी मांडलेल्या एक ना एक समस्येवर खासदारांनी बँकेच्या अधिकार्‍यांकडुन कारणमिमांसा ऐकुण घेतली.

पिक कर्जाच्या प्रकरणात वेगवेगळया कारणामुळे कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करत असल्याच उघड झाल. या बैठकीला जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे याही उपस्थित होत्या, त्यांनीही बँकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. शिवाय यापुढे अशा कोणत्याही बँकेने कर्ज देण्यास हयगय केल्यास त्यांच्यावर फाैजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला.

सध्या खरीप पिक कर्जाच्या वाटपास काही दिवसच मुदत राहिली आहे. तरीही आतापर्यंत फक्त अकराच टक्के वितरण केल्याचे दिसुन आले आहे.बँक अधिकार्‍याबरोबरची ही बैठक साडेतीन तास सुरु होती.आलेल्या प्रत्येक शेतकर्‍यांची  कर्ज प्रकरणे निकाली काढल्याशिवाय ही बैठक संपणार नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मुद्रा लोण, महामंडळ कर्ज योजना व एटीएम च्या समस्या याचाही आढावा यावेळी घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना यांच्यामध्ये पात्र न ठरलेल्या शेतकर्‍यांच्याही समस्येवर जिल्हा उपनिबंधकानी मार्ग काढला.

एकुणच खासदारांनी घेतलेल्या बैठकीमुळे तरी शेतकर्‍यांच्या अडचणी मार्गी लागल्या पण हीच भुमिका जिल्हा प्रशासनाकडुन घेतली असती तर लोकांवर एवढे दिवस थांबायचं वेळ आली नसती अशा भावना शेतकर्‍यांकडुन व्यक्त होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com