दानवेंनी केले पतंगबाजीतून 'ठाकरे' चित्रपटाचे प्रमोशन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या महत्वाकांक्षी चित्रपटाकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून या चित्रपटाचा प्रचार धुमधडाक्‍यात सुरू असतांना आता पतंगबाजीतून देखील 'ठाकरे' चे प्रमोशन केल्याचे पहायला मिळाले. मकरसंक्रांती निमित्त औरंगाबादेत ठाकरे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख असलेले असंख्य भगवे पंतग आज आकाशात उडवण्यात आले. 

औरंगाबादः शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या महत्वाकांक्षी चित्रपटाकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून या चित्रपटाचा प्रचार धुमधडाक्‍यात सुरू असतांना आता पतंगबाजीतून देखील 'ठाकरे' चे प्रमोशन केल्याचे पहायला मिळाले. मकरसंक्रांती निमित्त औरंगाबादेत ठाकरे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख असलेले असंख्य भगवे पंतग आज आकाशात उडवण्यात आले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे गारूड आजही महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर कायम आहे. आजच्या पिढीला त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख व्हावी यासाठी शिवसेनेचे नेते यांनी आधी 'बाळकडू' आणि आता 'ठाकरे' चित्रपटाच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. 'बाळकडू' चित्रपटाला बऱ्यापैकी यश मिळाल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगदी काही महिन्याआधी पुन्हा 'ठाकरे' च्या माध्यमातून शिवसेनेने महाराष्ट्रात वातावरण निर्मिती सुरू केली आहे. 

राज्य पातळीवर शिवसेनेचे नेते या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जीवाचे रान करत असतांना आता शिवसैनिकांनी देखील ही जबाबदारी स्वीकारली आहे. औरंगाबादेत मकरसंक्रांती निमित्त शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी हडको भागातील टीव्ही सेंटर मैदानावर पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी 'ठाकरे' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख असलेले शेकडो भगवे पतंग आकाशात उडवण्यात आले. शिवसेनेच्या या अनोख्या प्रमोशनची शहरभर चर्चा सुरू होती.

Web Title: shivsena promotes thakray name kites