उद्धव ठाकरेंना आम्ही सोडणार नाहीत, शेकडो शिवसैनिकांनी बॉण्ड पेपरवर दिले वचनपत्र

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल घडत आहेत.
shivsainik bond paper promissory note
shivsainik bond paper promissory notesakal
Summary

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल घडत आहेत.

पाथरी (जि. परभणी) - एकीकडे शिवसेनेचे नेते शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होत असतांना मात्र पाथरी तालुक्यातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शंभर रुपयाच्या बॉण्डवर शिवसेनेला न सोडण्याचे वचनपत्रच दिले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल घडत आहेत. राज्यभरात शिवसेनेचे नेते पक्ष सोडत असताना परभणी जिल्ह्यातील खासदार, आमदारासह पदाधिकारी मात्र पक्षप्रमुखांसोबत ठामपणे उभे राहिले आहेत. दरम्यान, आज पाथरी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व जुन्या शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भविष्यात ही आम्ही आपल्यासोबत राहू असे वचनपत्रच दिले आहे.

विशेष म्हणजे हे वचनपत्र शंभर रुपयाच्या बॉण्ड पेपरवर शिवसेना पक्षाच्या घटनेवर माझी पूर्णपणे निष्ठा असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्वावर अढळ निष्ठा असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेवर पूर्ण निष्ठा असल्याचे नमूद केले असून, यात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, शहरप्रमुख राहुल पाटील, यांचेसह माजी जिल्हापरिषद पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, सर्कल प्रमुख, उपसर्कल प्रमुख यांचेसह शेकडो जुन्या शिवसैनिकांनी चक्क शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर आम्ही आपल्या सोबतच असून शिवसेना सोडणार नसल्याचे वचनपत्रच लिहून दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com