संकट मोठं आहे, काळजी करू नका! शिवसेना तुमच्या पाठीशी : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

कंधार (नांदेड) : अतिवृष्टीग्रस्त शेतीच्या पाहणीसाठी मी स्वतः राज्यभर दौरे करीत आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. नुकसानीचा आढावा घेत आहे. संकट मोठं आहे. काळजी करू नका. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असा धीर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंधारमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिला.

कंधार (नांदेड) : अतिवृष्टीग्रस्त शेतीच्या पाहणीसाठी मी स्वतः राज्यभर दौरे करीत आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. नुकसानीचा आढावा घेत आहे. संकट मोठं आहे. काळजी करू नका. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असा धीर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंधारमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी (ता. 5) नांदेड दौऱ्यावर होते. नांदेडहून लोहा मार्गे ते दुपारी कंधारला पोहचले. लोहा रस्त्यावरील नगर पालिकेच्या कचरा डेपो जवळील भीमराव कांबळे व रमेश कांबळे यांच्या शेतातील पिकांची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानीची माहिती घेतली. धीर सोडू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास व्यक्त करून त्यांनी आपण सर्वजण एकत्रित लढून परिस्थितीवर मात करू असा शब्द दिला. अधिकाऱ्यांना मदतीचे आदेश दिले. यावेळी शेतकऱ्यांनी पीक हातचे गेल्याने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. घोडज (ता.कंधार) येथेही ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी हितगुज करून  नासाडी झालेल्या सोयाबीन, ज्वारी, कापसाची पाहणी करून शेतकऱ्यांना हतबल न होण्याचे आवाहन केले. यानंतर ते माळाकोळी मार्गे अहमदपूरकडे रवाना झाले.

यावेळी त्यांच्या सोबत सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, चंद्रकांत खैरे, जयदत्त क्षीरसागर, आमदार अब्दुल सत्तार, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद पाटील, श्री केकाटे, शिवसेना नेते अड. मुक्तेश्वर धोंडगे, गणेश कुंटेवार, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपविभागीय अधिकारी बोरगावकर, तहसीलदार सखाराम मांडवगडे, विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार विजय चव्हाण, राम बोरगावकर, मंडळ अधिकारी श्री सुजलेगावकर, श्री शेख, कृषिअधिकारी बैनाळे, तलाठी पांडागळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena is with you in your bad conditions says Uddhav Thackeray to farmers at Nanded