‘शिवशाही’ला अपघातांचे ग्रहण 

अनिल जमधडे 
शनिवार, 30 जून 2018

औरंगाबाद - एसटी महामंडळाने गेल्या वर्षी मोठ्या दिमाखात सुरू केलेल्या ‘शिवशाही’ बससेवेला अपघातांचे ग्रहण लागले आहे. राज्यभरात गेल्या तीन महिन्यांत शिवशाहीचे लहान-मोठे असे २५ पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. यामध्ये बस उलटण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे. या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले. 

त्यामुळे या बसच्या तांत्रिक बांधणीबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. राज्यातील खासगी प्रवासी वाहतुकीला तोंड देण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गेल्या वर्षी एसटीच्या ताफ्यात अद्ययावत वातानुकूलित शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. वातानुकूलित व आरामदायी शिवशाहीने अल्पावधीतच प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, या बसलाच होत असलेल्या अपघातांमुळे एसटी महामंडळासह परिवहन विभाग आणि प्रवाशांमध्ये यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. एसटीच्या चालकांच्या बस चालवण्याबाबत आक्षेप घेण्यात येत असून, शिवशाहीमध्ये तांत्रिक दोष असल्याचीही शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: shivshahi bus accident