लबाड गुरूजींना वेतन कपातीचा झटका!

नवनाथ येवले 
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नांदेड : शासनाच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करून दिशाभुल केल्याप्रकरणी शासन निर्णया नुसार जिल्ह्यातील ४४ शिक्षकांवार कारवाई टांगती तलवार आहे. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दोषी गुरूजींना एक वेतन वाढ कपातीसह इतरत्रबदलीसाठी तीन दिवसात पुरावेसादर करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.

नांदेड : शासनाच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करून दिशाभुल केल्याप्रकरणी शासन निर्णया नुसार जिल्ह्यातील ४४ शिक्षकांवार कारवाई टांगती तलवार आहे. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दोषी गुरूजींना एक वेतन वाढ कपातीसह इतरत्रबदलीसाठी तीन दिवसात पुरावेसादर करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.

जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या शासनाने पहिल्यांदाच राज्यस्तरावरून ऑनलाईन संगणकिया बदली प्रक्रिया राबवली. बदली प्रक्रियेच्या अवेदनपत्रात वस्तुनिष्ठ, खरी माहिती भरून स्वयंघोषीत प्रमाणीत करणे क्रमप्राप्त होते. मात्र, बदलीचा सोईनुसार लाभ घेण्यासाठी खोटी माहिती भरून गुरूजींनी शासनाची दिशाभुल केली. शिक्षक संघटनांच्या तक्रारीनुसार उघडकिस आलेल्या अनियमितेवरून मुळ जागी पदस्थापेनसह एक वेतन कपातीच्या कारवाईचे आदेश जारी करत जिल्हा परिषद स्तरावर मुख्यकार्यकारी अधिकारी यांना कारवाईचे अधिकार बहाल केले.  

त्यानुसार मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी तालुकास्तरावरून प्राप्त तक्रारीनुसार प्रस्तावाची छाणणी, सुनावणीद्वारे दोन्ही पक्षांना बाजू मांडण्याची संधी दिली. दरम्यान शिक्षक बदली प्रकरणी राज्यभरातील जिल्हा परिषदांनी दोषींवर कारवाईची फावडी पाडली. बाजु ऐकून तोलण्या पारखण्यात नांदेड जिल्हा परिषदेने वेळ घालवली हे सत्य नाकारता येणार नाही. चुकीची माहिती भरून बदली प्रक्रियेचा लाभ घेणाऱ्या गुरूजींची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यातील हजारावर शिक्षकांवर विस्तपीत होण्याची वेळ आली. सेवा जेष्ठतेनुसार खरी माहिती भरूनही खो बसल्याने ६० नरवस गुरूजींनी आप्तईष्ठांच्या माध्यमातून तक्रारी दाखल केल्या.

संवर्ग एक ते चार चा लाभ घेण्यासाठी खोटी माहिती भरणाऱ्या शिक्षकांमुळे जिल्ह्यातील हजारावर शिक्षक विस्तापीत झाले. जिल्हा प्रशासनाच्या माहिती नुसार राज्यशासनाने रॅंडम राउंडमध्ये पती पत्नी एकत्रीकरण बाजूला सारून सरसकट रिक्त पदांवर विस्तापीत शिक्षकांना पदस्थापना दिल्या. त्यामुळे बहूतांश शिक्षकांनी दिर्घ रजेवर राहून शासनाशी दोन हात केले. तक्रारीनुसार ४४ शिक्षकांनी खोटी माहिती दिल्याचे वारंवार सिद्ध होवूनही शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांनी बुधवारी (ता.१२) दोषी गुरूजींना एक वेतन कपातीसह ईतर ठिकाणी बदलीसाठी तीपन दिवाच्या पुरव्याची नोटीस बजावल्याने वारंवार दोष निश्‍चित होवूनही जिल्हा प्रशासनाचे नोटीस नाट्य सुरूच आहे . 

बदली प्रक्रियेतील अनियमितता प्रकिरणी दोषींवर कारवाईसाठी अंतिम नोटीसद्वारे मुदतीत पुरवे मागण्यात आले आहेत. लवकरच अंतिम  कारवाई करण्यात येईल 
- प्रशांत दिग्रसकर (शिक्षणाकिधारी प्राथमिक) 

Web Title: shock of cut of from salary to teachers