Electricity Bill : वीज ग्राहकांना दरवाढीचा ‘शॉक’ जूनच्या वीज देयकात ३० टक्के वाढ, ग्राहकांत संताप

वीज वितरण कंपनीने एप्रिल महिन्यापासून वीज देयकात तब्बल ३० टक्के वाढ केल्याने जून महिन्यात आलेल्या वाढीव देयकामुळे ग्राहकांना दरवाढीचा ‘शॉक’ बसला आहे.
shock to electricity consumers of unit price rise 30 percent hingoli
shock to electricity consumers of unit price rise 30 percent hingoliSakal
Updated on

Hingoli News : वीज वितरण कंपनीने एप्रिल महिन्यापासून वीज देयकात तब्बल ३० टक्के वाढ केल्याने जून महिन्यात आलेल्या वाढीव देयकामुळे ग्राहकांना दरवाढीचा ‘शॉक’ बसला आहे. भरमसाठ वाढ झाल्याचे निदर्शनास येताच अनेक जण महावितरण कार्यालय गाठून चौकशी करीत आहेत.

महावितरणने दिलेल्या देयकात इंधन समायोजन शुल्क आकारले आहे. संकटाच्या काळात खरेदी केलेल्या अतिरिक्त विजेचे हे शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क देयकात प्रति युनिट आकारून ग्राहकांकडून वसूल करण्यात आले आहे.

प्रति युनिटमागे वाढ झाल्याने देयकामध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. अतिरिक्त विजेपोटी महावितरणने विजेची दरवाढ केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दर महिन्याला येणाऱ्या देयकापेक्षा जून महिन्यात देण्यात आलेल्या देयकामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. १०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी ४० पैसे, १०१ ते ३०० युनिटसाठी ७० पैसे, ३०१ ते ५०० युनिटसाठी ९५ पैसे व त्यापेक्षा जास्त वापरासाठी १.०५ रुपये प्रतियुनिट शुल्काच्या नावावर प्रति युनिट वसुली करण्यात आली आहे.

सध्या १०० युनिटपर्यंत ४.७१ रुपये वीज दर आकारण्यात येत आहे. तर १०१ ते ३०० युनिटपर्यंत १०.२९ रुपये ग्राहकांना द्यावे लागत आहे. त्यामुळे ५.५७ अतिरिक्त द्यावे लागत आहेत. वीज वापराचा शुल्क व अतिरिक्त विजेपोटी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना देण्यात आलेल्या शुल्कात जवळपास ३० टक्के वाढ झाली आहे.

shock to electricity consumers of unit price rise 30 percent hingoli
Hingoli Student Strike : ‘आम्हाला शिक्षक द्या’ सीईओंच्या दालनात पुसेगावच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या

महावितरणच्या वतीने दोन एप्रिलपासून शहरी भागातील फिक्स्ड चार्जमध्ये वाढ करण्यात आली आहे.११६ रुपयांवरून १२८ रुपयांवर शुल्क वाढविण्यात आले आहे.प्रति युनिटमधील वीज दरात वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ९.८३ टक्के चार्ज आकारण्यात येत होता. एक एप्रिलपासून त्यात वाढ होऊन १०.२४ टक्के करण्यात आलेला आहे.

जून महिन्याच्या देयकामध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आहे. मात्र, ही वाढ भरमसाठ नाही. ग्राहकांवर अतिरिक्त शुल्काचा काही प्रमाणात बोजा पडत असला तरी देयकामध्ये किंचित वाढ झाली आहे.

-दिनकर पिसे, अभियंता, महावितरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.