esakal | धक्कादायक : हिंगोलीत पुन्हा दोघांना कोरोनाची लागन, संख्या पोहचली १६ वर 

बोलून बातमी शोधा

file photo

बुधवारी ( ता. २९) प्राप्त झाला असून आता कोरोना बाधितांची संख्या सोळावर पोहचली. जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. शोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.

धक्कादायक : हिंगोलीत पुन्हा दोघांना कोरोनाची लागन, संख्या पोहचली १६ वर 
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली :  मुंबई येथून परतलेल्या राज्य राखीव दलाच्या एका जवानासह बारसी येथून वसमतमध्ये आलेल्या अशा एकूण दोघाजणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल बुधवारी ( ता. २९) प्राप्त झाला असून आता कोरोना बाधितांची संख्या सोळावर पोहचली. जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. शोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्‍ह्‍यातील सर्वच आस्‍थापना लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यत (ता. तीन) मे बंद ठेवल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील १६ रुग्णांमध्ये १३ जण राज्य राखीव दलाचे जवान आहेत. तर अन्य एका व्यक्तीसह विलगीकरण कक्षातील एसआरपीएफ जवानाच्या संपर्कातील त्‍याचा पुतन्या (वय चार वर्ष) आहे.  त्‍याला कोवीड- १९ ची लागण झाली आहे. तो १४ वा रुग्ण आहे. क्वांरटाईन सेंटर सेनगाव येथील एका पाच वर्षीय बालकाला कोवीड- १९ ची लागण झाल्याचा अहवाल मंगळवारी (ता. २८) सकाळी प्राप्त झाला. हा पंधरावा रुग्ण आहे. क्‍वॉरंटाईन सेंटर वसमत येथील एका २१ वर्षीय तरूण जो बार्शीवरून शनिवारी (ता. २५) वसमत येथे आला आहे. व क्‍वॉरटाईन सेंटरमध्ये ॲडमीट होता त्‍याचा अहवाल 
आज पॉझीटीव्ह आला आहे. हा १६ रुग्ण  असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

हेही वाचा - Video : नांदेडच्या विद्याश्रीने घेतली लहान वयातच भरारी, कशी? ते वाचाच
  
एसआरपीएफ जवानासह दोन बालकांना कोरोनाची लागन

आजघडीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात हिंगोली एसआरपीएफचे बारा व जालना 
एसआरपीएफचा एक असे एकूण तेरा जवान पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर जालना येथील एसआरपीएफ जवानाच्या संपर्कातील त्याच्या चार वर्षे पुतण्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी (ता.28) पुन्हा सेनगाव तालुक्यातील जांभरून ( रोडगे) येथील पाच वर्षाच्या बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण संख्या १५ वर गेली असताना (ता.२५) एप्रील रोजी बारसी येथून वसमतमध्ये क्वारंटाइनमध्ये ठेवलेल्या २१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सोळावर पोहचली आहे.

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १६ वर 

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या १७ वर गेली होती. परंतु त्यातील एका व्यक्तीचा अहवाल शासकीय प्रयोग शाळेकडून निगेटिव्ह आल्याने आजघडीला कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १६ वर गेल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून ता. तीन मे पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पोलिस विभागाला दिले आहेत.

येथे क्लिक करा धक्कादायक ! तलाठ्याला फेकले नदीपात्रात

महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये.

दरम्‍यान कोरोनाविरुध्द लढ्यात हिंगोलीकरांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व 
नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.