धक्कादायक, महिलेचा रेल्वेतून पडून मृत्यू

rly
rly
Updated on

इस्लापूर ः नांदेडहुन नोकरीसाठी येणे जाणे करणाऱ्या एका तरुण महिलेचा हिमायतनगर जवळील सहस्त्रकुंड रेल्वेस्थानकात रेल्वेतून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.३१) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मागील दोन दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती, ज्यात इंजिनीअर पदविधारक युवकाचा असाच मृत्यू पाथरड रेल्वे स्थानकामध्ये रेल्वेतून पडल्याने झाला होता. या धक्कादायक घटनेने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.  

मंगळवारच्या घटनेत निलम प्रेमकुमार जोशी रा.मारवाडी गल्ली, सराफा मार्केट, नांदेड असा पत्ता असलेले आधार कार्ड व नांदेड-हिमायतनगर तिकिट पास महिलेच्या पर्समध्ये आढळुन आले. सदर महिला कर्मचारी असावी, पण ही महिला कोणत्या विभागात कर्मचारी आहे, याचा शोध लागला नाही.
 
हेही वाचा....परभणीसह नांदेड, हिंगोलीत पाऊस; रब्बी पिके धोक्यात

तोल गेल्याने घडली असावी घटना
शासनाने नेमनुक केलेल्या ठिकाणी राहून नोकरी न करता स्वतःच्या सोयीनुसार राहून अनेक शासकीय कर्मचारी नांदेड येथे राहुन येणे-जाणे करून नोकरी करतात. अशाच प्रकारे ही महिला नांदेडहुन नागपूर जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करत असताना हिमायतनगर रेल्वेस्थानकावर उतरण्याऐेेवजी सहस्त्रकुंड रेल्वेस्थनकावर उतरतांना घाई झाल्याने सदर महिलेचा तोल गेल्याने ती गाडीखाली आली. यात सदर महिलेचे दोन्ही पाय तुटल्याने डोक्यास जबर मार लागल्याने तिचा जागीज मृत्यू झाला. सदर महिलेस त्याच रेल्वेने किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने तिला मृत घोषित केले. 

दोन दिवसांपूर्वी इंजिनीअर पदविधारक युवकाचाही असाच मृत्यू
मुदखेडपासून जवळच असलेल्या पाथरड रेल्वे स्थानकामध्ये नांदेड-मुदखेड या रुळावरती धावत्या गाडीतुन पडुन इंजिनीअर पदविधारक युवकाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी सकाळी स्थानक प्रमुखाच्या निदर्शनास आली होती. ता.२८ च्या मध्यरात्रीनंतर ता.२९ च्या पहाटे नांदेड येथुन मुदखेडकडे जाणाऱ्या रेल्वेतून पडून अविनाश अशोक धुमाळ (वय २७, रा.मुखेड) या युवकाचा पाथरड येथील रेल्वे स्थानकामध्ये  मूत्यू झाला आहे. सदरील घटनेची माहिती रेल्वे स्थानकप्रमुखांनी बारड पोलिसांना देताच पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली सावंत यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व शवविच्छेदन बारड (ता.मुदखेड) येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.पांचाळ यांनी करून नमुना उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. अविनाश धुमाळ याच्या पार्थिवावर मुखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com