Attack
sakal
देवगाव रंगारी - समाईक शेतरस्त्याच्या वादातून भाऊबंदांमध्ये झालेल्या संघर्षात एका शेतकऱ्याच्या डोक्यात धारदार विळ्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना विटा (ता. कन्नड) येथे मंगळवारी (ता. ६) दुपारी दोनच्या सुमारास घडली. यावेळी दोन महिलांनाही लाकडी दांडका व लोखंडी गजाने मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.