esakal | हिंगोलीकरांनी अनुभवली निरव शांतता
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli Photo

कोरोनाच्या विषाणूने सर्वत्र थैमान घातल्याने संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना संशयित एका रुग्णाचे स्‍वॅब नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शुक्रवारपासून (ता.तीन) ते रविवारपर्यंत (ता.पाच) औषधी दुकाने वगळता इतर दुकाने सुरू ठेवण्यास मनाई केली आहे.

हिंगोलीकरांनी अनुभवली निरव शांतता

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्‍ह्यात एका कोरोना संशयिताचे स्‍वॅब नमुने पॉझिटीव्ह आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्‍हा प्रशासनाने देखील तीन दिवस औषधी दुकाने वगळता सर्वच आस्‍थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. याला नागरिकांनी प्रतिसाद देत शनिवारी (ता.चार) कडकडीत बंद पाळला. अनेकांनी तर गल्लीतील रस्तेही बंद केले आहेत.

कोरोनाच्या विषाणूने सर्वत्र थैमान घातल्याने संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना संशयित एका रुग्णाचे स्‍वॅब नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शुक्रवारपासून (ता.तीन) ते रविवारपर्यंत (ता.पाच) औषधी दुकाने वगळता इतर दुकाने सुरू ठेवण्यास मनाई केली आहे. नागरिकांनी देखील या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच राहणे पसंत केले.

हेही वाचा - ‘मी हिंगोलीकर... स्वयंशिस्त पाळणार, घरातच थांबणार!’

 गल्‍ली, नगरात बाहेरील एकही व्यक्ती येणार नाही याची काळजी घेत रस्‍ते बंद करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रमुख रस्‍तेही बंद करून टाकले आहेत. शनिवारी सकाळपासून शहरातील रस्‍त्‍यावर शुकशुकाट जाणवत होता. सकाळी शहरात येणारे बहुतांश दूध विक्रेते आलेच नाहीत. भाजी विक्रेत्यांनी देखील शुक्रवारपासून शहरात कोणत्याही गल्‍लीत प्रवेश केला नाही. 

कडकडीत पाळला बंद 

पाणी पुरवठारदांराना देखील पाणी जार देणे बंद केले. शहरात चौकाचौकात पोलिसांची गस्‍त होती. हिंगोलीसह सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी शहरासह ग्रामीण भागात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामीण भागात ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभाग, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर यांनी सहभाग घेत घराबाहेर कोणीही निघणार नाही, याची काळजी घेतली. दरम्यान विनाकारण फिरणारेही आता घरातच थांबत असल्याने सर्वत्र शांतता जाणवत होती.


घरकाम, बैठे खेळात व्यस्त

जिल्‍ह्यात केवळ औषधी दुकाने वगळता तीन दिवस दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. रस्‍त्‍यावर विनाकारण फिरणे देखील बंद झाल्याने प्रत्येकजण घरकामात व्यस्त झालेले पहावयास मिळत आहेत. व्हॉट्अपच्या माध्यमातून कोणती कामे करावीत, यासंदर्भात चर्चा केली जात आहे. तसेच लहान मुले बैठे खेळ खेळताना दिसून येत आहेत. 

येथे क्लिक कराहिंगोलीकरांना दिलासा; चौघांचे अहवाल निगेटिव्ह

कागदपत्रांची जुळवाजुळव

ओरिजनल केवासी, आधार कार्ड, पॅनकार्ड, डेबिट, क्रेडिट कार्ड एकत्र ठेवा, बँकेतील ठेवीची कागदपत्रे, शेअर्स, विमा पॉलीसी सर्टिफिकेट यांच्या मुळे प्रति फायलिंग करा, ड्रायव्हीग लायसन्सचे नूतनीकरण कधी आहे ते पहा, रेशन कार्ड, गॅस पासबुक आदी एकत्र ठेवा, यासह प्रॉपर्टी कार्ड, सातबारा उतारा, खरेदीपत्रे इत्यादी जुनी कागदपत्रे वेगळ्या फायलिंग करा आदींची माहिती व्हाट्अपवरून दिली जात आहे.