झेडपीतील वजनदार खात्यासाठी चुरस 

नवनाथ येवले
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

उपाध्यक्षपद शिवसेनेच्या पारड्यात आले असले तरी काँग्रेसचे सभापती रामराव नाईक यांना समाज कल्याण तर सभापती सुशिला बेटमोगरेकर यांना महिला व बालकल्याण खाते वाटप यापूर्वीच करण्यात आले आहे. 

नांदेड : जिल्हा परिषदेच्या कारभारी निवडीमध्ये संख्याबळानुसार काँग्रेसने अध्यक्षपद व चार विषय समित्या राखुन ठेवल्या. त्यातील शिक्षण व आरोग्य, बांधकम व अर्थ, कृषी व पशुसंवर्धन या खात्यांचे वाटप शनिवारी (ता. १५) विशेष सर्वसाधारण सभेतून होणार आहे. शिवसेनेकडून बांधकाम व अर्थ खात्याचा अग्रह होत असल्याने महाविकास आघाडीत वजनदार खात्यांसाठी चुरस निर्माण झाली आहे. 

राष्ट्रवादीने झुगारली कॉंग्रेसची आॅफर
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या सत्ता सथापनेत संख्याबळानुसार काँग्रेसने वर्चस्व राखले तर शिवसेनला उपाध्यक्षपदाची लॉटरी लागली. राष्ट्रवादीला मात्र संख्याबळाचे चक्रव्यूह भेदता आले नाही. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर विषय समित्यांसाठी सभापतींच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये काँग्रेसकडून महिला व बालविकास खात्याची राष्ट्रवादीला ऑफर देण्यात आली होती अशी माहिती आहे. पण राष्ट्रवादीने कॉंग्रेसची ऑफर झुगारली. त्यामुळे काँग्रकडून चारही सभापतींच्या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या. 

हेही वाचा - ‘या’ कारणामुळे तरुणींमध्ये वाढतोय न्यूनगंड

दोन खात्यांचे वाटप 
समाज कल्याण व महिला व बालकल्याण या दोन खात्यांचे प्रवर्ग निश्चित असल्याने काँग्रेसकडून सभापती रामराव नाईक यांच्याकडे समाज कल्याण तर सभापती सुशिला बेटमोगरेकर यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीचा कार्यभार सोपवून उर्वरित सहा खात्यांचे वाटप सर्वसाधारण सभेचा मुहूर्त राखुन ठेवला. शिसनेच्या उपाध्यक्षा पद्मा नरसारेड्डी सतपलवार यांच्यासह  सभापती संजय बेळगे, बाळासाहेब रावणगावकर यांच्या खात्याविषयी उत्सुकता लागून आहे. उपाध्यक्षा सौ. रेड्डी यांच्यासह काँग्रेसच्या दोन्ही सभापतीमध्ये वजनदार खात्यासाठी फिल्डींग लावण्यात आली आहे. 

विषय समित्यांची पदे रिक्त 
निवड प्रक्रियेमुळे जिल्हा परिषदेतील चारही विषय समित्यांच सदस्य संख्या आठने घटली आहे. यामध्ये स्थायी समितीवर चार, महिला बालकल्याण समितीवर दोन, बांधकाम समितीवर एक व शिक्षण समितीवरील एका पदाचा समावेश आहे. शनिवार (ता. १५) सर्वसाधारण सभेत केवळ खाते वाटप करण्यात येणार असल्याने विषय समितीच्या सदस्य निवडीसाठी सर्वसाधारण सभेची वाट पहावी लागणार आहे.

हेही तुम्ही वाचाच नांदेडच्या सायकलपटूंनी केली कमाल... वाचाच...

खाते वाटपाचा पेच 
शिवसेनेच्या उपाध्यक्षा पद्मा नरसारेड्डी सतपलवार यांना कृषी व पशुसंवर्धन खाते देण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या गोटातून बोलले जात आहे. मात्र, उपाध्यक्षा सौ. रेड्डी यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर वजनदार खात्याचा आग्रह धरल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दोन्ही सभापतींमध्ये चुरस निर्माण झाली आहे. शंकर महोत्सवासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण गुरुवारी शहरामध्य डेरे दाखल झाल्याने खाते वाटपाच्या पटलावरील पेच सुटेल काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silent for a weighty account in ZP Nanded News