सिल्लोड नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती, सदस्यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

नगरपरिषदेच्या विषय समितीची निवडणूक मंगळवार (ता. 13) बिनविरोध पार पडली. नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : नगरपरिषदेच्या विषय समितीची निवडणूक
मंगळवार (ता. 13) बिनविरोध पार पडली. नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते.

निवडण्यात आलेल्या विविध समितींच्या सभापतिपदी बांधकाम समिती सभापती अब्दुल समीर, शिक्षण समिती सभापती जितेंद्र आरके, स्वच्छता वैद्यकीय आणि आरोग्य समिती सभापती नंदकिशोर सहारे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती शेख आसिफ नबी, नियोजन व विकास समिती सभापती सुधाकर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती कडूबाई सपकाळ, उपसभापती कल्याणी गौर
यांची निवड झाली.

समितीनिहाय निवडण्यात आलेले सदस्य पुढीलप्रमाणे- सार्वजनिक बांधकाम समिती ः बेग चांद मिर्झा उस्मान, जितेंद्र आरके, सुधाकर पाटील, सुनील दुधे, शकुंतलाबाई बनसोड. स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती ः शबाना बेगम शेख बाबर, शेख मोहसीन अब्दुल रहीम, रईसखॉं पठाण, सत्तार हुसैन आजम हुसैन, कडुबाई सपकाळ. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती ः शेख मोहसीन रहिम, शेख रऊफ शेख मुसा, रईसखॉं पठाण, अब्दुल समीर, सविता झंवर. नियोजन व विकास समिती ः देशमुख नाजिया परवीन, पठाण जुम्माखान गुलशेर खान, नंदकिशोर सहारे, शेख महेजबिन वसईकर, नफिसा बेगम अब्दुल सत्तार.
महिला व बालकल्याण समिती ः कल्याणी गौर, मालताबाई डोभाळ, शकुंतलाबाई बनसोड, शबाना बेगम शेख बाबर, सय्यद समिनाबी. शिक्षण समिती ः नसीमबी पठाण, पठाण जुम्माखा, देशमुख नाजिया परवीन, शेख आसिफ नबी, बेग चांद मिर्झा उस्मान. स्थायी समिती ः शेख सत्तार हुसैन, सुनील दुधे. नवनिर्वाचित सभापती व सदस्यांचा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, देविदास लोखंडे, बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, गटनेते नंदकिशोर सहारे, विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बनसोड, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसैन, सुनील दुधे, रईस मुजावर, शेख मोहसीन, राजू गौर, आसिफ बागवान,
मतीन देशमुख, रतन डोभाळ, सांडू मिर्झा, सविता झंवर, सत्तार हुसैन, शबाना बागवान, जितेंद्र आरके, अकील वसईकर, मोईन पठाण यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sillod council committees selection