esakal | सिंदफणा वाहतेय दुथडी भरून, माजलगाव धरणातून सोडला मोठा विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

Majalgaon Dharan15

माजलगाव धरण कार्यक्षेत्रात परतीच्या पावसाने दमदार पाऊस पडला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणावर गुरूवारी (ता.१५) पहाटे ११ दरवाजे एक मीटरने उघडून ४३ हजार क्युसेकने सिंदफणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

सिंदफणा वाहतेय दुथडी भरून, माजलगाव धरणातून सोडला मोठा विसर्ग

sakal_logo
By
कमलेश जाब्रस

माजलगाव (जि.बीड) : माजलगाव धरण कार्यक्षेत्रात परतीच्या पावसाने दमदार पाऊस पडला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणावर गुरूवारी (ता.१५) पहाटे ११ दरवाजे एक मीटरने उघडून ४३ हजार क्युसेकने सिंदफणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सिंदफणा नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाळ्याच्या सुरवातीपासून वरूणराजाने चांगली हजेरी लावली.

उद्धव ठाकरेंनी फक्त बांद्राचे मुख्यमंत्री न राहता महाराष्ट्राचा विचार करावा, भाजपचे माजी मंत्री निलंगेकरांचा सल्ला

त्यामुळे धरणात पाण्याची मोठी आवक होत होती. धरणातून २३२ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. शनिवारी (ता.दहा) एक दरवाजातून बाराशे क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. मागील सात ते आठ दिवसांपासून धरण कार्यक्षेत्रात बरसत असलेल्या दमदार पावसाने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आली. परिणामी यावर्षी धरण भरल्यापासुन आजपर्यंत सर्वांत जास्त अकरा दरवाजांमधून गुरूवारी पहाटेपासुनच ४३ हजार क्युसेकने पाणी सिंदफणा नदीत सोडण्यात आले असल्याची माहिती धरणाचे उपविभागीय अधिकारी सी.एम.झेंड व धरण अभियंता बी. आर. शेख यांनी दिली आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर