औरंगाबाद दंगलीच्या तपासासाठी ‘एसआयटी’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

औरंगाबाद - औरंगाबादमधील दंगलीवरून आता राजकीय पक्षांकडून आरोप, प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पोलिस विभागाच्या कामगिरीवरही प्रश्‍नचिन्ह असून, दंगल कशी घडली, याच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आले आहे. 

दरम्यान, दंगलग्रस्त परिसर पूर्वपदावर येत असून, बाजारपेठाही खुल्या झाल्या. इंटरनेटसेवा मंगळवारी (ता. १५) सुरू होणार असल्याची माहिती प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.   

दंगलीचा एक व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून केले जात आहेत.

औरंगाबादची दंगल हे सरकारचे अपयश आहे. सरकारने त्वरित आर्थिक मदत दिली पाहिजे. राज्यात कोरेगाव भीमा ते औरंगाबाद दंगलीपर्यंत वेळोवेळी राज्य सरकार जातीय सलोखा टिकविण्यात अपयशी ठरल्याचे पुढे आले आहे. वारंवार गृहमंत्रिपद बदलण्याची मागणी होते; पण मुख्यमंत्री ते सोडत नाहीत
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

Web Title: SIT for aurangabad riot inquiry